मराठा आरक्षण: शिवसेना आमदाराचा राजीनामा



औरंगाबाद : - मराठा आरक्षणासाठी आता राजीनामास्त्र उगारण्यात आले असून शिवसेनेचे कन्नड मतदारसंघातील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवला आहे.
मराठा आरक्षणाबाबत तातडीने अध्यादेश काढण्यात यावा, अशी मागणी करत हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे. हर्षवर्धन यांनी ई-मेलद्वारे आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवला आहे

  • अध्यादेश काढा
मराठा आरक्षणावर केवळ चर्चाच सुरू आहे. त्यातून काहीच निष्पन्न होताना दिसत नाही. त्यात आता आत्महत्या होऊ लागल्याने स्थिती गंभीर बनली आहे. अशावेळी सरकारने अध्यादेश काढून स्थिती नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. मात्र सरकार स्वस्थ बसून आहे. त्यामुळेच मला विधानसभेचा सदस्य राहण्यात कोणतेही स्वारस्य राहिलेले नसून मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन यांनी माध्यमांना दिली.


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post