मराठ्यांचा महाराष्ट्र बंद सुरू; मराठवाड्यात शाळा बंद



  • अगमदनगर : श्रीगोंदा तालुक्यात घरगाव येथे नगर-दौंड रोडवर रास्तारोको सुरू
  • अहमदनगर: पाथर्डी शहरात सर्व व्यापारी पेठा बंद
  • अहमदनगर: जामखेड शहरात कडकडीत बंद... खर्डा चौक येथे आंदोलकांचा रास्तारोको
  • काकासाहेब शिंदे मृत्यू: तहसीलदार व पोलीस निरीक्षक निलंबित
  • आंदोलकांच्या रास्ता रोकोमुळं नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प... 
  • मराठा संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील शाळा-महाविद्यालये बंद...
  •  मुंबई: मराठा मोर्चा समन्वय समितीची आज दुपारी मराठा मंदिर येथे बैठक...
  •  सातारा, सोलापूर, पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात आज बंद... मुंबईत बुधवारी बंद पाळण्यात येणार
  • औरंगाबाद - पुणे महामार्गावर मोर्चेकऱ्यांचा ठिय्या...
  • मराठा संघटनांचा महाराष्ट्र बंद सुरू...


मुंबई :- आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून काल म्हणजेच सोमवारी (२३जुलै) औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणानं गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन तिसऱ्या दिवशी अधिक तीव्र केलं आहे. आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्र बंदची हाक दिली असली, तरी यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करू नये, अशा सूचना समन्वयकांनी दिल्या आहेत.





SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post