पिक विमा वेबसाईड सुरळीत नसल्याने सेतू केंद्र चालक अडचणीत



  • तालूक्यातील सेतू सुविधा केंद्र संचालकांचे तहसिलदाराकडे निवेदन सादर.


उमरखेड : मागील काही दिवसा पासून इंटरनेट सह पिक विमा फॉर्मची वेबसाईड सुरळीत नसल्याने तालूक्यातील सर्व सेतू केंद्र संचालक अडचणीत आले असून पिक विमा फॉर्मची वेबसाईड त्वरीत सुरळीत करून देण्याबाबत  त्यांनी आज नायब तहसिलदार विश्वंभर राणे यांना निवेदन सादर केले आहे.
सध्या तालूक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचा पिक विमा भरणे ३ जुलै पासून सुरू आहे.पिक विमा भरण्याचे शेवटचे चार दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी दिसत आहे. सध्या प्रत्येक सेतू सुविधा केंद्र संचालकांनी १०० ते १५० पिक विमा फॉर्म घेवून ठेवले आहेत. परंतू काही दिवसापासून पिक विमा फॉर्मची वेबसाईड सुरळीत सुरू नसल्याने रात्र व दिवस काम करून सुध्दा ३ ते ४ फॉर्म सुद्धा भरल्या जात नसल्याने व सदर फॉर्म भरण्यासाठी केवळ ४ दिवसाचा अवधी शिल्लक असल्याने सेतू केंद्र संचालकांचा मनस्ताप वाढला आहे. वेबसाईडच्या या अडचणीमूळे जर कोणत्याही प्रकारचे फॉर्म भरल्या गेले नाही  व या संदर्भात  एखादया शेतकऱ्याने तक्रार केली तर या बाबत आम्ही सेतू सुविधा केंद्र संचालक जबाबदार राहणार नाही. अशा आशयाचे निवेदन उमरखेड सह तालूक्यातील सर्व सेतू सेवा केंद्र संचालकांनी नायब तहसिलदार विश्वांबर राणे यांना दिले आहे. निवेदन देतात प्रशांत मेने, सचिन गाडगे, संजय भंडारे, जगदीश भुसावार, अविनाश गिरी, सुदर्शन कदम, अमोल विश्वांबरे , विठ्ठल मोरे, सुशिलकुमार शिंदे, दिपक बेद्रे, माधव माने, पप्पू कुरमे, अनिस काजी, किशोर पवार व बिचेवार उपस्थीत होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post