मेळघाट व्याघ्र प्रकल्प लगत असलेल्या झरी या गावाच्या वनपरिसरात आदित्य अनघा मल्टीस्टेट बँक शाखा हिवरखेड व सातपुडा फोऊंडेशन यांचे वतीने वृक्षरोपन करण्यात आले


जितेश कारीया
हिवरखेङ :- आज मेळघाट व्याघ्र प्रकल्प लगत असलेल्या झरी या गावाच्या वनपरिसरात आदित्य अनघा मल्टीस्टेट बँक शाखा हिवरखेड व सातपुडा फोऊंडेशन यांचे वतीने वृक्षरोपन करण्यात आले.यावेळी वृक्ष लागवड करण्यासाठी आदित्य अनघा बँकेचे शाखाधिकारी म्हसाल साहेब तसेच तुषार देशमुख निलेश मानकर शिपाई अभिषेक नाईक उपस्थित होते.वृक्ष लागवडी बाबत शाखाधीकारी म्हसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पर्यावरनाचे संतुलन साधण्याकरीता आजच्या परिस्थिती मध्ये वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.वृक्ष तोडीचे प्रमाणात वाढ झाली आहे.परंतु इतक्याच दुपटीने  वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे.वृक्षतोड मोठयाप्रमानात होत असल्यामुळे निसर्गाचे चक्र बदलत जात आहे या कारणामुळे मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन विकत घेण्याचे पाळी आज माणसांवर आली आहे.यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणांत वृक्ष लागवड करण्याचे आव्हान केले आहे.सातपुडा फोऊंडेशन चे अनिरुद्ध कवीश्वर हे वृक्ष लागवडीबाबत मोठयाप्रमात जनजागृती करून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील प्रत्येक गावातील संस्थेला वृक्षारोपण करण्यासाठी प्रेरित करीत असल्यामुळे अनिरुद्ध कवीश्वर यांचे अभिनंदन मा.म्हसाल साहेब यांनी केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post