प्रविण वैष्णव
अकोला :- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख खा अरविंद सावंत, यांच्या मार्गदर्शनाखाली आ गोपीकीशनजी बाजोरीया, सहसंपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर यांच्या अधिपत्याखाली जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी पाहता अकोला जिल्हाचा सर्कलनिहाय दौरा कार्यक्रम २ ते १४ आॅगस्ट २०१८ या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये २ आॅगस्ट २०१८ ला सकाळी १० वाजता चिखलगाव, दुपारी २ वाजता भौरद, सायंकाळी ५ वाजता शिवणी, ३ आॅगस्ट २०१८ ला सकाळी १० वाजता पातुर नंदापुर, दुपारी २ वाजता कुरनखेड, सायंकाळी ५ वाजता बोरगांव मंजू, ४ आॅगस्ट २०१८ ला सकाळी १० वाजता आगर, दुपारी २ वाजता उगवा, सायंकाळी ५ वाजता खडकी, ५ आॅगस्ट २०१८ ला सकाळी १० वाजता बाभूळगाव जहाॅ, दुपारी २ वाजता घुसर, सायंकाळी ५ वाजता दहीहांडा, ९ आॅगस्ट २०१८ ला सकाळी १० वाजता कान्हेरी सरप, दुपारी २ वाजता जाम वसु, सायंकाळी ५ वाजता राजंदा, १० आॅगस्ट २०१८ ला सकाळी १० वाजता महान, दुपारी २ वाजता जनुना, सायंकाळी ५ वाजता पिंजर, ११ आॅगस्ट २०१८ ला सकाळी १० वाजता चोहट्टा बाजार, दुपारी २ वाजता कुटासा, सायंकाळी ५ वाजता पिंजर, १२ आॅगस्ट २०१८ ला सकाळी १० वाजता अकोली जहाॅ, दुपारी २ वाजता अकोलखेड, सायंकाळी ५ वाजता उमरा,१३ आॅगस्ट २०१८ ला सकाळी १० वाजता दानापुर, दुपारी २ वाजता हिवरखेड, सायंकाळी ५ वाजता अडगांव, १४ आॅगस्ट २०१८ ला सकाळी १० वाजता दहीगाव, दुपारी २ वाजता भांबेरी, सायंकाळी ५ वाजता पाथर्डी
या सर्कलचा समावेश आहे. या दौऱ्यात माजी आमदार गजाननराव दाळु गुरूजी, माजी आमदार संजय गावंडे, डॉ विनित हिंगणकर, विजय मालोकार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, बंडू ढोरे, दिलीप बोचे, रविंद्र पोहरे, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनिकर, संतोष अनासाने, तरूण बगरे, शिवसेना महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख ज्योत्स्नाताई चोरे, जिल्हा संघटीका सौ देवश्रीताई ठाकरे, सौ मायाताई म्हैसने, अकोला पुर्व तालुका प्रमुख विकास पाटील, पातुर तालुका प्रमुख रविंद्र मुरतळकर, बाळापुर तालुका प्रमुख संजय शेळके, अकोट तालुका प्रमुख शाम गावंडे, मुर्तिजापुर तालुका प्रमुख अप्पु तिडके, तेल्हारा तालुका प्रमुख विजय मोहोड, बार्शिटाकळी तालुका प्रमुख गजानन मानतकर आदींसह युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. तरी या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी आर्वजुन उपस्थिती राहावे असे आवाहन अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.