इकबाल मुल्ला
लोहारा /प्रतिनीधी :- मराठा समाजाबरोबरच धनगर व मुस्लीम समाजास आरक्षण देण्यासाठी विधिमंडळात विशेष अधिवेशन घेऊन कायदा करण्याची मागणी शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केल्याबद्दल मुस्लीम समाजाच्यावतीने उध्दव ठाकरे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
गेल्या काही वर्षापासून आरक्षणाची मागणी जोर धरत आहे.त्या अनुषंगाने मराठा समाजाच्यावतीने मोर्चे,आंदोलने केली जात आहेत. परंतु मुस्लीम व धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणीच बोलत नाही.मात्र शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मराठा समाजाबरोबरच मुस्लीम व धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून त्यात कायदा करून मान्यतेसाठी संसदेकडे पाठविण्याची मागणी केली आहे.प्रथमच मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत उध्दव ठाकरे यांनी महत्वाची भूमिका घेतल्याने शहरातील मुस्लीम समाजाने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला आहे.यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अयनोद्दीन सवार,नगरसेवक आरिफखानापुरे,शफ्फु हेड्डे,आयुब मुल्ला,महेबूब पठाण,अल्ली चाऊस,अल्ताफ पठाण,कलीम मुल्ला, इक्बल मुल्ला,ताहेर पठाण,अल्ताफ सुंबेकर,वसीम पठाण,मोईन सय्यद,अदि उपस्थित होते.