- पुरवठा अधिकारींना दिले निवेदन
यवतमाळ- ग्राहक संरक्षण समिती यवतमाळचे संस्थापक अध्यक्ष अमन निर्बान द्वारे यवतमाळ जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर प्रवर्गनिहाय अशासकीय सदस्यांची निवड करण्यात यावी याकरीता 10 जुलै रोजी ग्राहक संरक्षण समिती यवतमाळ द्वारे निवेदन देण्यात आले. या निवेदनात ग्राहक हक्काचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद गठीत करण्याची तरतुद शासनाने केली आहे. त्यानुसार प्रत्येक लोकशाही दिनी ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठका घेणे अशा बैठकांना प्रसिध्दी देणे, बैठकीद्वारे जनतेच्या तक्रारींचे निवारण करणेकरीता ग्राहक संरक्षण परिषद व इच्छुक विविध उमेदवारांची निवड करणे आवश्यक आहे. यानुसार इच्छुक उमेदवारांनी 30/11/2017 पर्यंत अर्ज सादर केलेत. यात शासनाने दिलेल्या निर्देशनुसार उमेदवारांनी कागदपत्रांसह अर्ज सादर केले परंतु आठ महिने लोटून सुध्दा यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे ग्राहकांची बरीच तारांबळ होत असून ग्राहकांचे प्रश्न प्रलंबीत आहे. उपरोक्त बाबीमध्ये त्वरीत निर्णय घेवून प्रलंबीत यवतमाळ जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर प्रवर्गनिहाय अशासकीय सदस्यांची निवड करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी ग्राहक संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष अमन निर्बाण, ज्योती चिखलकर, अमोल गावंडे, आशा काळे, उषा कांबळे, समिना खान, वैष्णवी चिखलकर, शेख राजीक, अब्दुल सलीम आदी उपस्थित होते.
