इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुका गटशिक्षण कार्यालयाच्यावतीने कार्यक्रम जिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक विकास संस्था चे प्राचार्य डॉ.कलिम शेख,जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी जाधव,लोहारा गटशिक्षणाधिकारी
तबसुम सय्यदा यांच्या मार्गर्शनाखाली लोहारा तालुक्यातील सर्व शाळेत अध्यन स्तर निश्चिती कार्यक्रमास दि.10 जुलै पासुन सुरुवात करण्यात आली आहे.हा कार्यक्रम पाच दिवस चालणार आहे.
यावेळी मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक एस.बी.जट्टे, अदि उपस्थित होते.
या माध्यमातुन विद्यार्थाची अध्य नस्तर निश्चीतीद्वारे विधार्थीची क्षमता प्रगती गुणवत्ता पाहणी करुन व उपचार या विषयी माहीती देण्यात येत आहे.व विध्यार्थाची वैयक्तिक माहिती घेण्यात येत आहे.
यामध्ये भाषा व गणित या दोन विषयी इयत्ता 2 री पासुन पुढे अध्यन स्तर निश्चीती करण्यात येत आहे.
यामध्ये विद्यार्थी गुणवत्ता,पातळी,विद्यार्थी किती क्षमता प्राप्त केले आहेत.भाषा व गणित या विषयात प्रगत आहे का ? अध्यन कोणत्या स्तरावर आहे. त्या साठी.अ प्रगत किवा अध्य न स्तरात मागे आहे.तो प्रगत व्हावा त्याला सर्व क्षमता प्राप्त व्हाव्यात त्या साठी काय उपचार करता येईल,मुल शाळेस आला पाहिजे टिकला पाहीजे शिकला पाहीजे,या सर्व माहिती विद्यार्थ्यांना या कार्यक्रम अंतर्गत माहिती देण्यात येत आहे.व एकही विद्याथी शिक्षणापासूण वंचीत राहणार नाही.अनंदायी शिक्षण देण्यात यावे,विदयार्थांना अध्यन गोडी लागावे असे पोषक वातावरण निर्माण करीत आहेत.लोहारा तालूक्यातील सर्व संबधीत कर्मचारी अंग झटकूण कामाला,लगले आहेत.
हा कार्यक्रम जिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक विकास संस्था चे प्राचार्य डॉ.कलिम शेख,जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी जाधव,लोहारा गटशिक्षणाधिकारी
तबसुम सय्यदा यांच्या मार्गर्शनाखाली लोहारा तालुक्यातील सर्व शाळेत विसार अधिकारी एन.टी. आदटराव,डी.एम.जंगम,सी.एस.जाधव,श्रीमती आर. सी.मैंदर्गी,एम.जी.वाघमोडे,एस.एम.शेख,बी.बी.पवार,पी.ए.शिंगाडे,एम.आर.भरगंडे,आर.एस.चव्हाण,ए.जी.लहाणे,बी.एस.अंकुश,एस.एम.काळे,डी.एच.
सोनकांबळे,संध्या बडुरे,शबाना शेख,हे सर्वजन लोहारा तालुक्यातील प्रत्येक शाळेत जावुन विद्यार्थ्याना माहीती देवुन प्रभावीपणे कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमास प्रत्येक शाळेतुन चांगला प्रतिसाद मिळत आहे.
