विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना डेंग्यू


मुंबई :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांच्यावर लोणी येथे उपचार सुरू आहेत.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नागपूर येथील रविभवन या विरोधी पक्षनेत्यांच्या सरकारी बंगल्यालगत पाणी साचले होते. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादूर्भाव झाला होता. त्यातून विखे पाटील यांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post