- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे तिनतेरा - आमदार, जि.प. सदस्याचे दुर्लक्ष
पांढरकवडा - प्रतिनिधी :- स्वातंत्र्य पुर्व काळापासून जंगली भागात वसलेल्या बोटोणी (पालगांव) हे गाव पक्क्यारस्त्याच्या प्रतिक्षेत असून 500 ते 600 मीटर अंतराचा मुख्य मार्गाला जोडणाया रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. देशात व राज्यात असलेल्या काँग्रेस व भाजप शासनाच्या काळातही हे गाव स्वातंत्र्य पुर्वकाळापासून रस्त्याकरिता प्रतिक्षेत आहे. अडीच किमीच्या या मार्गाचे अर्धे डांबरीकरण झाले होते तेही अत्यंत निकृष्ठ असे डांबर वापरून करण्यात आले आहे उर्वरीत काही रस्ता चालु वर्षात बनविण्यात आला मात्र या रस्त्याचा 500 मीटर अंतराच्या भागाचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम रखडलेले आहे. या संदर्भात सदर प्रतिनिधीने जि.प. सदस्या सौ मिनाक्षीताई बोलेनवार यांची भेट घेतली असता रस्त्या मंजुर झाल्याचे सांगून आठवडा भरात काम सुरू होईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र महिना लोटला तरिही साधी गिट्टी व मुरूम सुध्दा टाकण्यात आलेला ना.ही त्यामुळे वाहतुकीच्या या कच्च्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून पाणी साचून चिखल होऊन वाहने चालविणे ही तारवेरची कसरत बनली आहे. या रस्त्याने पाई चालणे सुध्दा कसरतीचे काम बनले आहे. आमदार संजय बोदकुलवार यांनी निवडणुकीपुर्वी निवडून आलो की रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते मात्र ते आमदार होऊन त्यांचा कार्यकाळ संपत आला तरी रस्ता अपुर्णच आहे. जिल्हा परिषदेवर भाजप - काँग्रेस यांची संयुक्त सत्ता असून जिल्हा परिषद सदस्या हा भाजपाच्याच आहेत मात्र तरिही रस्त्याचे काम अपुर्ण अवस्थेत असल्याने जनतेत कमालीचा रोष व्यक्त होत आहे. आमदार व जिल्हा परिषद सदस्या यांनी याकडे विशेष लक्ष घालून हा रस्ता पुर्णत्वास न्यावा अशी मागणी बोटोणी वासियांनी केली आहे.
