इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील भातागळी सज्जा अंतर्गत कास्ती खुर्द येथे खरीप हंगाम 2018 च्या पिकविमा भरण्यासाठी लोहारा तहसिलदार शोभा पुजारी व नायब तहसिलदार रणजीत शिराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासंदर्भात मार्गदर्शन करून मोफत सातबारा वाटप करण्यात आले.यासाठी मंडळ आधिकारी
ए.आर.यादव,तलाठी सुरेश खरात यांनी पुढाकार घेतला होता.यावेळी सरपंच सविता गुंड,उपसरपंच महेश वकील,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
