शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वृक्ष रोपणचा कार्यक्रम संपन्न



यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आज दिनांक २०/७/१८ रोजी मा.डॉ. श्रीगिरिवार सर (अधिष्ठाता) यांचे मार्गदर्शन व अध्यक्षात फॉरेन्सिक डिपार्टमेन्टच्या परिसरात वृक्ष रोपणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
मा. अधिष्ठाता सर यांचे कल्पना तुन हे वृक्ष रोपण चे कार्यक्रम राबविण्यात येत आहे मा. अधिष्ठाता यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्व डिपार्टमेन्टला विनंती करून आपला वैद्यकीय महाविद्यालय कसा सुंदर व हिरवा करता येईल या बद्दल त्यांच्या मनात नवीन चेतना जगविण्याचा काम केला आहे.


मा. अधिष्ठाता हे नेम ही नवीन नवीन उपक्रम हाती घेतात सध्यस्थितीत यवतमाळ जिल्ह्यात कॉलराचा रूग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे लक्षात येताच मा. अधिष्ठातानी आपले अधीनस्त असलेल्या पि एस एम डिपार्टमेन्टला आदेशीत करून यवतमाळ मधील सर्व शाळेत जाऊन कॉलरा रोग बद्दल शाळेतील लहान मुलांना माहिती व मार्गदर्शन करण्यास आदेश दिले व मा. अधिष्ठाता स्वतः शाळेत जाऊन मुलांना मार्गदर्शन केले मा. डॉ . श्रीगिरिवार सर  अधिष्ठाता पदावर रूजू झाले पासून आता पर्यंत महाविद्यालयची उंची वाढवण्यासाठी नेम ही प्रयत्न करतात दिसते.
या वृक्षरोपणाचे कार्यक्रमात मा. डॉ. कुचेवार सर, मा. डॉ. मस्के सर, श्रीमती डॉ. सनोबर शेख, मा. लिहितकर सर प्रशासकीय अधिकारी, मा. डॉ. चेतान जनबाधे सर, पतसंस्थाचे अध्यक्ष मा. नगेलवार, सचिव मा. श्री. आनंद अडसूळ,  उपाध्यक्ष श्री गोविंद राठोड कर्मचारी नेते मा. मंगेश वैद्य, सामाजिक कार्यकर्ता मोहम्मद आसिम अली, मोहम्मद विकार उल्लाह, डॉक्टर व कर्मचारीवर्ग उपस्थित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post