लाखपुरी येथे झालेल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीच्या नुकसानीचा सर्वे करण्यास शासनास मुहुर्ते निघेणा..



  •   लोकप्रतिनीधीनचे दुर्लक्ष....
  •  मा. उपविभागीय अधिकारी मार्फेत जिल्हाधिकारी यांना निवेदन 
  •  लाखपुरी येथे झालेल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसानीचा तातडिने मदत देण्याबाबत..
  • संपुर्ण वुत्तपत्र व प्रसारमाध्यमानी घेतली लाखपुरी येथील हजारो हेक्टर शेतीच्या नुकसानीची दखल शासन करणार का नुकसानीचा  सर्वे...


 अतुल  नवघरे
लाखपुरी : -२१  मुर्तिजापुर तालुक्यातील  लाखपुरी येथे दि.१४-०७-२०१८ रोजी रात्री ७ ते ९ यावेळेस खुप जो-यात पाऊस आल्यामुळे हजारो हेक्टर शेतीचे पिक पाण्यामुळे खरडुन गेले. लाखपुरी येथील २ घरांचे खुप मोठया प्रमाणात नुकसान झाले व लाखपुरी शिवारातील शेती संपुर्ण पाण्यामध्ये होती. व पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे रात्री ७ ते ९ या वेळेला २ तास वाहतुक विस्कळीत झाली होती. या अवकाळी पाऊसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.  दि. ६-०७-२०१८ पासुन १४-०७-२०१८ पासुन सतत सुरु असलेल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले.व शेतक-यावर दुबार पिरणीचे संकट आले आहे.यामध्ये लाखपुरी, रसुलपुर ,रेपाटखेड , खुदावंतपुर , दातवी , दुर्गवाडा व इतर गावाचा समावेश आहे.या नुकसाना बाबत वुत्तपत्रामध्ये व प्रसारमाध्यामानवर बातम्या प्राकशित झाल्या परंन्तु शासनाने याकडे लक्ष न देता दुर्लक्ष केले, म्हणुन या सबंधी लाखपुरी सर्कल मधील शेतक-यांनी दि. १७-०७-२०१८ ला मा. जिल्हाधिकारी अकोला , मा. उपविभागीय अधिकारी मुर्तिजापुर  , मा. तहसिलदार साहेब मुर्तिजापुर  , मा. आमदार साहेब मुर्तिजापुर , मा. वुत्तपत्र संपादक/ पत्रकार/  यांना निवदेन दिले आहेत. परन्तु शासनाने अजुन पर्य़ंत यांची दखल घेतली नाही . हि एक शोंकातिका आहे . शासनाने सदर झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्या करिता महसुल विभागाला व कृषी विभागाला तातडीने सर्वे करण्याचे आदेश देवुन शेतक-यांला तातडीने आर्थिक मदत द्यावी व दुबार पेरणी करिता बियाने उपलब्ध करुन द्यावे अशी  मागणी लाखपुरी सर्कलच्या शेतक-यांनी केली आहे . जर शासनाने यावर दखल न घेतल्यास तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा लाखपुरी सर्कलच्या शेतक-यानी दिला आहे. निवेदन देतांना पुरुषोत्तमजी डागा , अतुल नवघरे  , जितप्रसाद कैथवास , काशिनाथ धानोरकर , सोमेश दहापुते , सुमित मेश्राम  , नागसेन जामनिक , शुभम जामनिक इ.उपस्थीती होती.



तलाठी व मंडळ अधिकारी यांनी लाखपुरी येथे झालेल्या शेतीच्या  नुकसानाची प्राथमिक पाहमी केली असुन सविस्तर रिपोर्ट सादर करतील.
भागवत सैदाने ( उपविभागीय अधिकारी मुर्तिजापुर )

लाखपुरी शिवारामध्ये झालेल्या नुकसाना ची शासनाने तातडीने सर्वे करुन शेतक-यास बियाणे व झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अन्यथा लाखपुरी सर्कलच्या वतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येर्ईल यांची संपुर्ण जबाबदारी शासनाची राहील.

अतुल नवघरे ( लाखपुरी सर्कल अध्यक्ष भारिप )
लाखपुरी शिवारातील झालेल्या नुकसाना बाबत प्राथमिक पाहणी  तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केली असुन सर्वे करण्यास कुषी विभाग व महसुल विभातील यंत्रणा सर्वे करण्यास येतील.
राहुल तायडे ( तहसिलदार मुर्तिजापुर )

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post