लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात निवडणुक साक्षरता क्लबची स्थापना


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय दि.20 जुलै रोजी निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आली आहे.
भारतीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थेत निवडणूक साक्षरता कलबची स्थापना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्या अनुषंगाने शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात निवडणूक साक्षरता कलबची स्थापना करण्यात आली आहे.या क्लबचे अध्यक्ष संदिप माळी तर उपाध्यक्ष भैरवनाथ कदम तर सचिव कांचन जवादे यांची निवड करण्यात आली.तर कॅम्पस प्रतिनिधी म्हणून आकाश भूसकंडे या विध्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या क्लबचे नोडल अधिकारी प्रा.व्ही.डी.आचार्य यांची निवड करण्यात आली आहे.तर मार्गदर्शक म्हणून प्रा. डी.एन.कोटरंगे यांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाचे उदघाटन नायब तहसीलदार देशटवड यांनी केले.यावेळी नायब तहसीलदार देशटवाड यांनी विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली
या एस.ए.गवळी,प्रकाश राठोड,यांच्यासह  महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post