इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- शिष्याच्या जीवनातील अंधकार दूर करून सम्यकदृष्टी देण्याचा प्रयत्न गुरू करत असतो.त्यामुळेच मानवी जिवनामध्ये गुरू शिष्याचे नाते अतुट आहे,असे प्रतिपादन प्रा.संजय जोशी यांनी व्यक्त केले.
गुरू पौर्णिमानिमित्त लोहारा हायस्कूलमध्ये शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी जोशी बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुधाकर पांचाळ होते.
यावेळी प्रमुख म्हणुन सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोकणे,विजय ढगे,उदय कुलकर्णी,नगरसेवक बाळासाहेब कोरे,शुभलिंग स्वामी,प्रा.राजपाल वाघमारे,मनोज लोहार,अमित वेदपाठक,पत्रकार निळकंठ कांबळे,अदि उपस्थित होते.
यावेळी लोहारा हायस्कूलमधून शिक्षण घेऊन उच्चपदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थांकडून दरवर्षी शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाते. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने दि.27 जुलै रोजी विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच शाळेला पाण्याची टाकी भेट दिली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद पोतदार व
सूत्रसंचलन विजय नागणे यांनी केले तर आभार सतिश जट्टे यांनी मानले.या कार्यक्रमास विठ्ठल वचने-पाटील,वैजनाथ पाटील,बाळासाहेब लांडगे,वसंत राठोड, दिलीप शिंदे,शिल्पा साबणे,सदाशिव बचाटे, सारिका चिकटे,निर्मला कोळी,विद्या मक्तेदार,स्वाती माशाळकर,प्रद्मुन देवकर,गोपाळ सुतार,शिवराज शिदोरे,वैजिनाथ होळकुंदे,शेषेराव घोडके,यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.