लोहारा शहरात एस.टी.बसडेपो मंजुर झाल्याने नागरीकांचा जल्लोष


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरात बसडेपो सुरू करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कदम यांनी वेळोवेळी निवेदन,उपोषण,आंदोलन करून प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.अखेर या मागणीला यश प्राप्त झाल्याने राज्य परिवहन महा मंडळाने हिरवा कंदील दाखवून शहरात एस.टी. डेपोस मंजुरी दिली आहे.
  शहरातील एस.टी.डेपो मंजुर झाल्याची माहिती मिळताच यासाठी सतत पुढाकार घेऊन प्रशासनाकडे विविध मार्गाने पाठपुरावा करणारे लोहारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कदम यांनी दि. 21 जुलै रोजी शहरातील शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतषबाजी व पेढे वाटुन जल्लोष साजरा केला.यावेळी राज्य शासनाचे व राज्य परिवहन महामंडळाचे ग्रामस्थांनी आभार मानले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कदम, नगरसेवक आयुब अब्दुल शेख,मिलाप ग्रुपचे दादा मुल्ला,ग्रंथालय संघटनेचे तालुका अध्यक्ष मोहन गोरे,राजेंद्र गोसावी, मुबारक गवंडी,दत्ता वाघ,उत्तम अण्णा पाटील, यांच्यासह शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post