यवतमाळ :- यावर्षी यवतमाळ शहरामध्ये भीषण पाणीटंचाई दरम्यान आम्ही यवतमाळकर टिमने शासनाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची योग्यरित्या नियोजन न करणे व यवतमाळकरांना स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागले. यादरम्यान आम्ही यवतमाळकर टिम वर्ल्ड सोशल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार व प्रशासनाच्या विरोधात पिण्याच्या पाण्याच्या समस्येचे निवारण करण्याकरीता आंतरराष्ट्रीय स्तरावर आंदोलन करण्यात आले. आम्ही यवतमाळकर टिमचे मुख्य संयोजक अमित मिश्रा त्यांचे सहकारी सुनील तिवारी, अॅड.जयसिंग चव्हाण, विजय बुंदेला, श्याम बजाज, चंद्रशेखर चौधरी, सैय्यद सोहराब, अॅड.विपीन ठाकरे, अॅड.इम्रान देशमुख, अॅड.अजय चमेडिया, अविनाश गनेवार, अफसर शहा, सचिन आगलावे यांच्या अथक प्रयत्नातून जनआंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला संपूर्ण देश-विदेशातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. याची दखल घेत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन ने आम्ही यवतमाळकर टिम वर्ल्ड सोशल ऑर्गनायझेशनला नामांकीत केले आहे. त्याचे प्रमाणपत्र इंदोर येथील मर्रिओट इंटरनॅशनल हॉटेल येथील 28 जुलै 2018 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार्या विशेष कार्यक्रमात देण्यात येणार आहे. या ऐतिहासिक आंदोलनाला यवतमाळवासी, फिल्मी कलाकार, देश-विदेशातील अनेकांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी वीरेंद्र शर्मा मेंबर ऑफ पार्लिमेंट इंग्लैंड, डॉ.दिवाकर सुकूल चेयरमैन वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड यूनाइटेड किंगडम, राजीव शुक्ला माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार, अधिवक्ता संतोष शुक्ला सुप्रीम कोर्ट ,भारत प्रेसिडेंट वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड, भारत, डॉ. राजिव श्रीवास्तव वाइस प्रेजिडेंट वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड, सुरभी कौल जनरल सेक्रेटरी वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. यवतमाळ शहरात झालेल्या जनआंदोलनाची दखल घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. याबद्दल आम्ही यतवमाळकर टिमचे मुख्य संयोजक अमित मिश्रा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
