- सरकारने धनगर,मराठा तसेच मुस्लिम समाजाचे आरक्षण लागू करावे मौलाना नदीम सिद्दीकी यांची मागणी
मुंबई दिनांक २५ जुलै,महाराष्ट्र राज्यात मराठा व धनगर सामाज्या तर्फे आरक्षणा साठी काढण्यात येणारे मोर्चे तसेच आंदोलनाला जमीअत ए उलेमा महाराष्ट्राचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे जमीअत ए उलेमा महाराष्ट्राचे अध्यक्ष मौलाना नदीम सिद्दीकी यांनी एका पत्र व्दारे जाहीर केले आहे . तसेच त्या साठी जनतेने संयम राखण्याचे देखील आवाहन केले आहे. तसेच राज्य सरकार कडे गंभीरपणे मराठा धनगर व मुस्लिम समाजास आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आणि त्यांच्या इतर जाती मधील पिछाडीवर असलेल्या लोकांना शिक्षण, नोकरी, सरकारी तसेच बिनसरकारी जागेत आरक्षण देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आज मुंबई येथे मराठा समाज्याच्या आंदोलनाला पाठींबा देण्याच्या व्यक्तव्यात मौलाना नदीम सिद्दीकी यांनी केली आहेत.जमीअत ए उलेमा ने नेहमी सामाजिक विषयावर आपला आवाज बुलंद केला आहे.राज्यात मुस्लिमाना आरक्षण देण्याची मागणी सर्वात प्रथम जमीअत ए उलेमा महाराष्ट ने केली आहे व या साठी जमींअत ए उलेमा महाराष्ट ने सर्व जिल्ह्यामधे कलेक्टर ,डेप्युटी कलेक्टर ,तहसीलदार यांच्या कार्यालयावर आंदोलने आयोजित केली होती. ही आंदोलने काही महिने सुरूच होती.याच आंदोलनामुळे मागील सरकारने रंगनाथ मिश्रा कमिशन राजेंद्र सच्चर कमिशन व राज्य सरकार चे महमूदूर रहमान कमिशन च्या शिफारशींच्या आधारावर मुस्लिमाना ५ व मराठ्यांना १६ टक्के आरक्षण देण्याचे केले होते त्याला १४ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबई उच्य न्यायालयाने स्थगिती दिली होती, कोर्टाने मराठा समाजाचे आरक्षण पूर्ण पणे रद्द करून मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्था मध्ये ५ टक्के आरक्षण बहाल केले होते व सरकारी नोकरीतील आरक्षणाला स्थगिती दिली होती या नंतर २४ नोव्हेंबर २०१४ रोजी फडणवीस सरकारने नागपूर अधिवेशनात एक बिल मंजुर केले व त्या मध्ये फक्त मराठा समाजाला आरक्षण देण्याचे मान्य केले होते मुस्लिम समाज्याच्या आरक्षणाचा त्या मधे उल्लेख नव्हता. मौलाना नदीम सिद्दीकी यांनी पुढे म्हटले कि मागासवर्गीय मुस्लिमांच्या आरक्षणाच्या मागणीची सुरुवात जमींअत ए उलेमा ए हिंद चे माजी अध्यक्ष फिदा ए मिल्लत मौलाना असद साहेब मदनी यांनी केली होती व त्यांच्या मार्फत झालेल्या आंदोलना मुळे आंध्रप्रदेश,केरळ,प बंगाल येथे तेथील राज्य सरकारांनी मुस्लिमाना आरक्षण दिले आहे. महाराष्टात देखील आम्ही या साठी काही महिने शांतिपूर्वक प्रदर्शने केली होती परंतु आमची मागणी वर्षनुवर्षापासून आहे पूर्वीच्या सरकारने आरक्षणाची घोषणा केली त्यावेळी समाजा मध्ये चांगली भावना निर्माण झाली होती परंतु त्या सरकारने फारच उशिर केला होता त्या नंतर सरकार बदलले व नवीन सरकारने आरक्षणाचा निर्णय बदलला या मुळे मुस्लिम सामाज्याचे फारच नुकसान झाले आहे मौलाना नदीम सिद्द्दीकी यांनी पुढे म्हटले आहे कि आम्ही हिम्मत हरलो नसून आम्ही स्वस्थ बसलो नाहीत आरक्षणासाठी पुन्हा प्रयत्न सुरु केले गेले व २ फेब्रुवारी २०१५ रोजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांची जमीअत ए उलेमा महाराष्टाच्या उच्च स्थरीय समिती मार्फत भेट घेऊन आरक्षण देण्या संधर्भात चर्चा केली व त्या वेळी त्यांना मुस्लिम आरक्षणाच्या मागणीचे एक मेमोरेंडम देण्यात आले.१८ ऑक्टोबर २०१६ रोजी मुस्लिम आरक्षणासाठी राज्यस्तरारीय आंदोलन केले त्यात लाखो लोकांचा सहभाग होता. आरक्षणाच्या मागणी साठी २० ऑक्टोबर रोजी मुंबई येथे (आझाद मैदान) भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या नंतर १५ डिसेम्बर २०१६ रोजी नागपूर येथे विधान सभेच्या अधिवेशना दरम्यान मोठ्या मेळाव्याचे आयोजन केले गेले होते त्या मेळाव्यास काईदे मिल्लत मौलाना मेहमूद मदनी हजर होते.या वेळी सुध्दा मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन घटनात्मक दृष्ट्या मागासवर्गीय मुस्लिमाना मिळालेले आरक्षण देण्याची मागणी काण्यात आली होती .९ ऑगस्ट २०१७ रोजी पुन्हा एकदा जमीअत ए उलेमा महाराष्ट्राच्या उच्चस्थरीय समितीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन इतर विषया बरोबरच आरक्षणा विषयी चर्चा केली त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देताना पूर्वीच्या सरकारा पेक्षा त्यांचे सरकार मुस्लिम समाजासाठी चांगले काम काण्याची हमी दिली होती, मौलाना नदीम सिद्दीकी यांनी आरक्षण आर्थिक शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय मुस्लिमांचा घटनात्मक हक्क आहे सरकार हा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. आमची राज्य सरकार कडे पूर्वीच्या सरकार ने व आंध्र प्रदेश सरकार प्रमाणे सरकारी,निमसरकारी,प्रायव्हेट क्षेत्रात शैक्षणिक तसेच नोकरी साठी आरक्षण देण्याची मागणी करत आहोत. त्यांनी म्हटले आहे कि मुस्लिमाना टाळून देश प्रगती करू शकत नाही जर देशाला खुशहाल बनवायचे असेल तर देशाती सर्वात मोठा अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे मौलाना नदीम यांनी म्हटले आहे त्या साठी आरक्षणा शिवाय पर्याय नाही. त्यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला मराठा समाज्याच्या आंदोलना संधर्भात शांततेचे आवाहन केले असून आम्ही मराठा समाज्याच्या आरक्षणाच्या मागणीस पूर्ण पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले असल्याची माहिती सोनोरी दारूल उलुम मदरसे अध्यक्ष तथा जमिअते उलेमाचे सचिव मौलाना मुफ्ती रौशन यांनी दिली आहे
