'शिवरायांची शपथ! मी मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं'



बीड :- 'मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाइल माझ्याकडं असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिलं असतं,' असं राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं.
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या काही भागात आजही आंदोलन सुरूच आहे. बीडमधील परळी इथं मराठा बांधवांनी आज ठिय्या आंदोलन केलं. पंकजा मुंडे यांनी तिथं जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना पंकजा यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला ठाम पाठिंबा दर्शवला. 'आरक्षणाच्या प्रश्नावर मी मराठा समाजाच्या सोबत आहे. मी मराठा बांधवांची दूत बनणार आहे. आरक्षण मिळावं यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाईन,' असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post