गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीच्या 2225 जादा बसेस.



गणेशोत्सव जवळ आला असून मोठ्या प्रमाणात कोकणवासीय आपल्या गावी जात असतात. रेल्वेचे बुकिंग फुल झाले असून, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटीकडून 2225 बसेसची सोय करण्यात आली आहे. परिवहन मंत्रीव एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी हीमाहिती दिली आहे.कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या इतर विभागाकडून 2225 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. जवळपास एक महिना अगोदर म्हणजेच ९ ऑगस्टपासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत.१ ऑगस्ट पासून ग्रुप बुकिंगला सुरुवात होईल. या ग्रुप बुकिंगसाठी संबंधितांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावाच्या यादीसह आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना अधिक सुविधा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि.८ सप्टेंबर २०१८ ते दि. १२ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये नियमित वाहतुकी शिवाय जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ८ ते ९ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या  देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी ‘वाहन दुरुस्ती पथक ‘ (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post