उमरसरा येथे देशी कट्टा व काडतुस जप्त


 यवतमाळ :- विठ्ठलवाडीच्या भाजी मंडीत यापुर्वी देशी कट्टा व दोघा आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला यश मिळाले. याच शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरज बोंडे यांना त्यांच्या गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली. या माहितीवरुन सुरज बोंडे हे पंच व सहकार्यासह उमरसरा परिसरात तीन फोटो जवळ पोहचले. येथे उभ्या असलेल्या एका इसमाला विशाल उर्फ राजन जगेश्वर मिश्रा (33) रा. मिथील नगर उमरसरा याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक जिवंत काडतूस व एक काळ्या रंगाचा लाकडी मुठ असलेला देशी कट्टा किंमत अंदाजे 5 हजार 500 रुपयाचा आढळून आल्याने सदर मुद्देमाल आरोपीकडून जप्त करुन त्यांना अवधूतवाडी पो.स्टे.ला आणले. त्यांच्या विरुद्ध कलम 3/25 आर्म ऍक्ट  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कामगीरी जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक अमरसिंग जाधव, मुकूंद कुळकर्णी पोलीन निरिक्षक यांच्या मार्गदर्शनात सुरज बोंडे,भिमराव शिरसाट, गजानन डोंगरे, किशोर झेंडेकर, महेश पांडे,  सुरेंद्र वाकोडे, आदींनी यशस्वीरित्या पार पाडली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post