इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील खेड येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश शिवशंकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.21 जुन रोजी खेड येथील राजीव गांधी विद्यालयातील अनाथ मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.व त्याच बरोबर शाळेतील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बार्टीचे समादुत नागेश फुलसुंदर व किरण चिंचोले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समादुत नागेश फुलसुंदर यांनी केले.तर आभार अविनाश पवार यांनी मानले.या कार्यक्रमास गावातील सरपंच, ग्राम पंचायत सदस्य,निर्धार गट समितीचे अध्यक्ष, बार्टीचे समतादूत नागेश फुलसुंदर,किरण चिंचोले, विश्वभर शहापुरे,यांच्यासह शाळेतील मुख्याध्यापक,सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Superb!
Reply