विलास नसले
मुर्तीजापूर (प्रतिनिधी):- मुर्तीजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डोल्हारकर यांची दि.12 जुन रोजी बदली करण्यात आली होती. त्यांची बदली झाल्याचे समजताच फटाके फोडून मिठाई वाटण्या आली होती. त्यांचे विरूद्ध अविश्वास ठराव व हक्कभंग पारित करण्यात आला होता. त्यांची बदली झाल्यानंतर नगर परिषद वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. मुर्तीजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून लोणार येथून विजय लोहकरे आणि अंबेजोगाई येथून आशिष लोकरे यापैकी एकाची वर्णी लागणार असल्याचे सांगितले जात होते. जास्त पसंत लोहकरे यांच्या नावाला होती. या सर्व चर्चांना विराम देत मुख्याधिकारी डोल्हारकर हे न्यायालयीन आदेश क्रमांक 0A.नंबर 421/2018(s.b.)दि.18.6.18 नुसार रुजू झाले. ते रूजू झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. मुर्तीजापूर शहरवासी आणि मुर्तीजापूर शहराचा विकास तसेच मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी व नागरिकांना सुविधा प्राप्त करून देण्यासाठी विशेष प्रयत्न प्रामाणिकपणे करावे अशा अपेक्षा नगरसेवक तसलिमखाॅ बिसमिल्लाखा यांनी व्यक्त केली.
