शिष्यवृत्ती बँक खात्यात तीन हजार रुपये सक्तीने न ठेवण्याबाबत तात्काळ कार्यवाही करा शेतकरी संघर्ष समिती ची मागणी



विध्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून ते पदवीत्तोर शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती साठी बँक खात्यात किमान तीन हजार रुपये असले पाहिजे असा अजब फतवा बँकांनी काढला असून त्यातून विध्यार्थ्यांना सूट देण्याची मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे शेतकरी संघर्ष समितीने केलेली आहे
केंद्र सरकारची व राज्य शासनाच्या वतीने विविध योजने खाली शिष्यवृत्ती हवी असल्यास आधारकार्ड व बँकेमध्ये खाते सक्तीचे केले आहे. तर बँकेमध्ये ‘झीरो बॅलन्स’ खाते सुरू केले जात नाही. त्यासाठी सुमारे दोन ते तीन हजार रुपये भरून खाते उघडावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सातशे ते दीड हजारच्या शिष्यवृत्तीसाठी सुमारे तीन हजार रुपयांचे खाते उघडावे लागणार आहे. एवढे पैसे देखील भरायला नसल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, कचरावेचकांच्या मुलांना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागत आहे.


केंद्र सरकारच्या वतीने अस्वच्छ व्यवसायात काम करणार्‍या पालकांच्या मुलांना अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीचे 1850 रुपये मिळतात. 2013 पासून ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. इयत्ता पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते. प्रत्येक शाळेकडून पात्र विद्यार्थ्यांची यादी समाजकल्याण, आदिवासी विभाग व अन्य विभागाकडे देण्यात येते. शाळांकडून ऑनलाईन अर्जही भरण्यात येतात; मात्र आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नसल्याने शिष्यवृत्ती देण्यात बऱ्याचदा टाळाटाळ होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे शेकडो विद्यार्थी यापासून वंचित राहण्याची भीती आहेत. 2016-17 आणि 2017-18 या शैक्षणिक वर्षातील पहिली ते दहावीमध्ये शिकणार्‍या आणि या योजनेस पात्र असणाऱ्या हजारो  विद्यार्थ्यांची यादी शासनाला दिली आहे या विद्यार्थ्यांना तात्काळ दिलासा देण्यात यावा.

बँक खाते सक्तीचे असल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, कागद-काच-पत्रा कष्टकरी पालकांच्या वतीने बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. खाते सुरू करण्यासाठी ‘झिरो बॅलन्स’ ही पद्धती बंद झाल्याचे बँकांकडून सांगण्यात येत आहे. सुमारे दोन ते तीन हजार रुपये बँकेमध्ये भरून बँक खाते सुरू करावे, अशा सुचना बँकेकडून मिळत आहेत. शेतकरी, शेतमजूर व कचरावेचकांच्या मुलांना एवढी रक्कम भरणे कठिण होत आहे. त्यामुळे त्यांना झिरो बॅलन्स वर खाते सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी आंदोलनाचे हत्यार उचलावे लागणे उचित नाही त्यामुळे रखडलेली शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना झिरो बॅलन्स अकाउंट मधून दिल्या जावी अशी मागणी आहे.  तरी बँकांना आपण तश्या सूचना देऊन शिष्यवृत्ती धारक विध्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली या वेळी जी प चे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, जी प च्या शिक्षण आरोग्य सभापती सौ नंदिनीताई दरणे, पणन महामंडळाचे संचालक सुरेश चिंचोळकर, जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस अनिल गायकवाड, जिल्हा काँग्रेस चे सचिव दिलीप बालू काळे,  कळंब खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बालू पाटील दरणे, निखिल गायकवाड, अक्षय कुम्भरखाने, निखिल पवार, सौरभ गोंडे, प्रसन्न राउत, शैलेश जपाते, गौरव इंगले, आनंद बुटले, शुभम दैवत, प्रसाद ठाकरे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post