इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील राम नगर येथील बेऴंब तांड्यातील नागरीकांसाठी पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी,अन्यथा प्रशासनाविरुध्द तिव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा भारतीय बंजारा क्रांती दल प्रदेश सरचिटणीस तथा भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा जिल्हा अध्यक्ष किशोर पवार यांनी दिला आहे.
या भागातील नागरीकांना पिण्याचे पाणी मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणही करण्यात आले होते. हे उपोषण सुरू असताना गटविकास अधिकारी व तहसीलदार येऊन आम्हाला पाणी व रस्ते करून देतो असे सांगितले.अशी आम्हाला लेखी देखील दिली आहे.या प्रमाणे पाणी उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा होती.परंतु या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. तरीही या भागातील नागरिकांना पाणी पुरवठा होत नाही.याबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करुन देखील पाण्याची व्यवस्था केलेली नाही.बेळंब ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामसेवकला भेट घेवुन सांगितले कि रामनगर तांडा येथील नागरिकांना लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची सोय करावी असे सांगीतले.यावेळी ग्रामसेवक यांनी सांगीतले कि उद्या बैठकीत हा विषय घेवुन सोडवितो असे सांगीतले.बैठक झाली तरीपण पाण्याची व्यवस्था केली आहे.पाण्याची व्यवस्था नाही केली तर रास्ता रोको व आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा किशोर पवार यांनी दिला आहे.यावेळी चंद्रकांत राठोड,प्रदीप राठोड,बालाजी राठोड,पिंटू राठोड, विनोद पवार,अदि,उपस्थित होते.