युवासेनाप्रमुख तथा शिवसेना नेते मा.आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य अकोला जिल्हा युवासेने तर्फे 5 जून ते 30 जून दरम्यान आदित्य महोत्सवाचे आयोजन



अकोला : - शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख मा.आदित्य साहेब ठाकरे यांचा वाढदिवस 13 जून रोजी असून अकोला जिल्हा युवासेनेतर्फे "आदित्य महोत्सवाचे" आयोजन करण्यात आले आहे. आदित्य महोत्सवा अंतर्गत युवा-विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्याचा मानस आहे. युवासेनाप्रमुख तथा शिवसेना नेते मा.आदित्य साहेब ठाकरे हे कायम युवक व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांसाठी लढत असतात. युवकांचा खेळात उत्साह वाढावा,खेळाकडे युवा-विद्यार्थी आकर्षित व्हावे, नवनवीन खेळाडू घडावेत, खेळाडूंचा विकास व्हावा म्हणून आदित्य साहेबांच्या आदेशाने सर्वच जिल्ह्यांमध्ये युवा खेळ या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.13 जून रोजी त्यांचा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिम्मित महाराष्ट्र भर वेगवगेळे उपक्रम हे युवासेनेमार्फ़त होत असतात.त्यामध्ये अकोला जिल्हा युवासेनेतर्फे "आदित्य महोत्सवाचे" आयोजन करण्यात आले.


  • आदित्य महोत्सवा अंतर्गत वेगवेगळ्या शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजण करण्यात आले आहे.त्यामध्ये प्रामुख्याने पुढीलप्रमाणे काही कार्यक्रम..



  •      घर तिथे वृक्ष अभियान
  •      10 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत    
  •      निकाल व निकालाची प्रत....
  •      रक्तदान शिबिर
  •    
  •    10 वी व 12 वी च्या    
  •      विद्यार्थ्यांचा वृक्ष व सन्मान 
  •      पत्र देऊन सत्कार सोहळा
  •      
  •      प्लास्टिक बंदी, प्लास्टिक 
  •      पिशवी टाळा यावर 5000 
  •      माहिती पत्रक व कापडी 
  •      पिशव्यांचे वाटप...
  •     
  •      गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे 
  •      वाटप व इतर शालेय साहित्य 
  •      वाटप.....
  •    यशस्वी युवा खेळाडूंचा     
  •      सत्कार....
  •   
  •    निबंध स्पर्धा
  •      विषय-:
  •     १) आजचा युवा
  •     २) युवकांचे नवीन व्यसन 
  •          सोशल मीडिया
  •     ३) पुस्तक.. की.. सोशल      
  •          मीडिया ?
  •     ४)शिवसेना नेते युवासेनाप्रमुख       
  •         मा.आदित्य ठाकरे

  •     निबंध स्पर्धे साठी वरील     
  •       चार विषय असून 300 शब्दां 
  •       पर्यंतची मर्यादा आहे. 25 
  •       जून पर्यंत निबंध जमा 
  •       करण्याची मुदत आहे. निबंध 
  •       स्पर्धा ही वयोगट 14 ते 35 
  •       पर्यंत आहे. युवा-विद्यार्थ्यांनी 
  •       निबंध हे संबंधित युवासेना 
  •       पदाधिकार्यांजवळ
  •        जमा करावे.

  •   उत्कृष्ट फोटोग्राफी स्पर्धा-:     
  •     तुम्ही स्वतः काढलेला 12    
  •        ×8 साईज मध्ये फोटो प्रिंट 
  •        करून संबंधित युवासेना 
  •        पदाधिकार्यांजवळ 
  •        जमा करावे.

  •     10 वी 12 वी नंतर काय ?      
  •        करिअर मार्गदर्शन शिबीर...



वरील प्रमाणे शिवसेना नेते युवासेनाप्रमुख मा.आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिम्मित आदित्य महोत्सवा अंतर्गत शैक्षणिक व सामाँजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून येणाऱ्या 5 जून ते 30 जून दरम्यान हे कार्यक्रम होणार असून त्यामध्ये निबंध स्पर्धा,फोटोग्राफी स्पर्धा,करिअर मार्गदर्शन शिबीर,घर तेथे वृक्ष अभियान, SayToNoPlastic या अभियानात मोठ्या संख्येने

  • जिल्यातील नागरिक,युवा-विद्यार्थी व बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे. युवासेनेचा एकच हेतू-उद्देश असून युवक-विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने आदित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


 निबंध व फोटोग्राफी स्पर्धा यासाठी अंतिम तारीख 25 जून 2018 असून स्पर्धकांनी निबंध व फोटो पाठवावे.असे आवाहन  युवासेना अकोला जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post