काही दिवसा अगोदर राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या व विविध मागणी साठी 1 जून ते 10 जून पर्यंत शेतकरी संप आयोजित केला आहे,
तरी सर्व तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी संपात समाविष्ट होऊन भाजीपाला फेकून आपल्या संवेदना वेक्त केल्या
दिनांक 6-6-1018ला तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते .यावेळी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मोर्चा मधे सहभाग घेतला होता .गेल्या काही वर्षा पासून सतत ची नपीकी व शेतमालास भाव नाही त्यात कर्जाचे डोंगर या सर्व समस्यमुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे . त्यावर हे निर्कट्ट सरकार शेतकऱ्यांचे असू न पुसता त्याची थट्टा करत आहे .शेतकरी अहोरात्र पीकवतो त्या पिकाला पुरेसा भाव मिळत नाही.नफेड ची खरेदी कधी चालू कधी बंद या सर्व समस्या ला ग्रासले आहेत .या सर्व संशयाला कंटाळून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे .
तालुक्यातील शिवसेनेचे प्रवीण वैष्णव,विक्रांत शिंदे,बंटी राऊत, रोहित पवार,सचिन मोरे,सचिन थाटे,रामभाऊ फाटकार,भय्यां देशमुख,विशाल नंदोकार,
प्रहार चे वीक्की मल्ल,रवींद्र ताथोडं,प्रफुल दबघागाव,वैभव खाडे, गणेश बावसकर,सुनील जाधव,
कॉग्रेस,प्रशांत देशमुख,अनंता सोंनमाळे,
भारिप,गोवर्धन पोहोरकार,अशोक दारोकार, सोनू दारोकर, प्रेम तायडे,तसेच तालुक्यातील दिनकर दुतोंडे, राजू इंगळे,इत्यादी सह बहुसंख्य तालुक्यातील शेतकरी व सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्तीत होते
या शेतकरी संपला आमचा पाठिंबा आहे
या सरकारने जर आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण नही केल्यास आम्ही सर्व तेल्हारा तालुक्यातील शेतकरी संपात समाविष्ट होऊन अधिक तीव्रतेने आंदोलन करू असा इशारा या वेळी देण्यात आला.
