सिरसोली ता.तेल्हारा जि.अकोला येथे गेली १० दिवसापासून सुरू असलेल्या
श्री.गुरुदेव सर्वागीण बाल संस्कार शिबिराचा ४ जून रोजी समारोपिय कार्यक्रम व निसर्गवासी सुनंदाताई सत्यपाल चिंचोळकर यांचा तृतीय स्मृतिदिन संपन्न झाला.यावेळी निसर्गवासी सुनंदाताई सत्यपाल चिंचोळकर
यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आद.संध्याताई वाघोडे
जिल्हा परिषद अध्यक्षा अकोला,
मनिष रामाभाऊ कराळे सभापती न.प.अकोट,श्री.लांजुळकर दादा,
श्री.प्रा.प्रेमकुमार बोके साहेब,
श्री.डॉ.तराळे साहेब,
श्री.सांगळूदकर साहेब,
श्री.कांगुळकर गुरुजी,
श्री.मंगेशदादा वानखडे,
श्री.बरगट दादा,श्री.खापरकर दादा,श्री.देवीदासजी काईंगे(माजी सरपंच सिरसोली),श्री.प्रवीण पाटील डीक्कर,श्री.राजेश पाटील,श्री.विजू भाऊ ढेपे,श्री.पराग गवई,श्री.विनोद सगणे(वार्ताहर),संदीपपाल महाराज,रामपाल महाराज,
पंकजपाल महाराज,इंजि.पवन दवंडे,ऋषीपाल महाराज पवनपाल फुकट महाराज तसेच इतर मान्यवर व पालक वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात... विध्यार्थ्यांच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत केले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व आसनाचे पूजन करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांनी यावेळी संकल्पगीत,स्वागतगीत सादर केले.त्यांनतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थितांसमोर शिबिरामध्ये शिकलेले आपले गुण,कौशल्य सादर केले त्यामध्ये भाषण देण्याची कला,योगासने प्रात्याक्षिक,लाठीकाठी प्रात्याक्षिक,लेझीम,भजने सादर केली.तसेच गुणी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यामध्ये आदर्श विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रत्येक सहभागी विध्यार्थ्यांला २०० रु ची किमतीचे पुस्तके आणि संत गाडगे बाबा/राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली.शिक्षक वृंद आणि शिबिराला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तीचे तथा उपस्थित मान्यवरांचा संत गाडगे बाबा आणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्यपाल महाराजांनी सत्कार करण्यात केला.शेवटी आभार प्रदर्शन व राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.