लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुरूम येथील किशोर शंकर पवार यांची दि.30 मे रोजी भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.किशोर पवार हे भारतीय बंजारा क्रांती दल महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस आहेत.
भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रितेशजी राठोड यांनी या निवडीचे नियुक्ती पत्र दिले आहे.हे पद सुनिल (भाऊ) जाधव महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रभारी भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे.
किशोर पवार यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या मित्रपरिवार व बंजारा क्रांतीदलाच्या व मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद कार्यकर्त्याच्यावतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
किशोर पवार यांचा जय हिंद करियर अकॅडमी मुंबई चे संस्थापक अध्यक्ष प्रदीप (भाऊ) राठोड,सेवा बचत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत (दादा) राठोड,बालाजी राठोड,विनोद पवार,पिंटू राठोड आदींनी कुशोर पवार,अदिंनी अभिनंदन करुन निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.
