एन.एस.यु.आय (विद्यार्थी काँग्रेस) च्या अमरावती जिल्हा कार्यकारिणीत गौरव पवार व संकेत साहू यांची वर्णी ..


अमरावती - नुकताच काँग्रेस पक्षांतर्गत महाराष्ट्र प्रदेश  व जिल्हा विद्यार्थी काँग्रेस एन.एस.यु.आय. च्या झालेल्या  निवडणुकीत अमरावती जिल्हा एन. एस.यु.आय च्या निवडणुकीत जिल्हा उपाध्यक्ष पदी गौरव पवार,जिल्हा महासचिव पदी संकेत साहू,उपाध्यक्ष पदी अथर्व वंजारी ,जिल्हा सचिव पदी पारस चौधरी विजयी झाले.महाराष्ट्र प्रदेश एन. एस.यु.आय च्या निवडणूका दर दोन वर्षांनी होत असून महाराष्ट्र एन.एस. यु.आय  च्या निवडणुका गेल्या ६ महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील महाविद्यालयात विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी करण्यात आली.


त्यामध्ये गौरव पवार हे  दुसऱ्या क्रमांकाचे २१५मत घेऊन जिल्हा उपाध्यक्ष पदी निवडून आले तर संकेत साहू यांनी महासचिव पदी जिल्ह्यत प्रथम क्रमांकाचे १२८ मते घेऊन विजय प्राप्त केला .सदर निवडणूक ही युवक काँग्रेसचे गुड्डू धर्माळे, निलेश गुहे ,बबलू बोबडे, प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे निनाद मानकर यांच्या नेतृत्वाखाली लढवली असून  जिल्ह्यातील या सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी त्यांच्या  नियुक्तीचे श्रेय अमरावती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख,आमदार येशोमती ठाकूर,आमदार विरेंद्र


जगताप,प्रदेश काँग्रेस प्रदेशमहासचिव संजय खोडके,माजी आमदार रावसाहेब शेखावत,मनपा विरोधीपक्ष नेते बबलू शेखावत,माजी महापौर विलास इंगोले ,एन एस यु आय चे राष्ट्रीय सचिव शिवराज मोरे यांना दिले असून.सदर निवडणूकित त्यांना पियुष वसू, स्वप्नील साहू,असंघटित कामगार काँग्रेस चे अध्यक्ष फिरोज शाह उर्फ भुऱ्या भाई ,प्रदेश एन एस यु आय चे सचिव शुभम देशमुख,प्रदेश विद्यार्थी काँग्रेस चे अजिक्या आरेकर, अमरावती एन.एस.यु.आय चे माजी उपाध्यक्ष संकेत बोके,


 एन एस यु आय चे प्रवक्ते शुभम पारोदे,शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभाग चे अध्यक्ष सागर कलाने,अंजनगाव काँग्रेसचे सुयोग खाडे,वालगाव युवक काँग्रेसचे मयुर मेश्राम, प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे प्रवक्ते ओजस मोरे,विद्याभरती कॉलेज चे छत्रसंघ सचिव मो.दानिश, हिमांश देशमुख, अनुप देशमुख, उदय उबाळे,अभिषेक पांडे,गौरव चांदूरकर, सचिन राठी, आदींचे सहकार्य लाभले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post