दोघांना शस्त्रासह पकडले



  • टोळीविरोधी पथकाची कामगीरी

यवतमाळ(प्रतिनिधी) :  शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून राबविण्यात येणाऱ्या मोहिमे दरम्यान टोळीविरोधी पथकाला दि. 21 जून रोजी गोपनिय माहिती मिळाली की अवधुतवाडी व शहर पो.स्टे. हद्दीतील वैद्य नगर व पाटीपूरा या परिसरात प्रेम रमेश कैथवास (19) रा. वैद्य नगर, आशिष अशोक शेळके (26) रा. सुराणा लेआउट हे दोन्ही आरोपी हाती घातक धारदार तलवारी घेवून सार्वजनिक ठिकाणी फिरत आहे, अशी माहिती मिळताच टोळीविरोधी पथकाने त्वरीत घटनास्थळ गाठून शिताफीने आरोपींना अटक केली. या दोन्ही आरोपीजवळून दोन धारदार तलवारी ताब्यात घेवून त्यांच्याकडून होणारा गुन्ह्याचा कट उधळला. घातक शस्त्रासह आरोपींना ताब्यात घेवून यवतमाळ शहरात होणाऱ्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याला आळा घालून या आरोपीविरुद्ध अवधुतवाडी व शहर पो.स्टे.ला आर्म ऍक्ट 4/25 नुसार गुन्हा नोंद करुन अटक केली. ही कारवाई पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक अमरसिंह जाधव, पोलीस निरिक्षक कुळकर्णी यांचे मार्गदर्शनात टोळीविरोधी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक संतोष मनवर, ऋषी ठाकुर, संजय  दुबे, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, विनोद राठोड, जयंत शेंडे, श्रीधर शिंदे, सतिश सिडाम, आकाश सहारे, यशवंत जाधव, शशिकांत चांदेकर, गौरव ठाकरे यांनी पार पाडली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post