यवतमाळ(प्रतिनिधी) : प्लास्टीकची पिशवी जर तुमच्याजवळ आढळली तर ती जप्त करुन तुम्हाला त्याच ठिकाणी 5 हजार रुपये दंड आकारल्या जाईल. असाच प्रकार दुसऱ्यांदा घडल्यास दहा हजार रुपये दंड आणि कारावासाची शिक्षा होईल, ही मोहिम यवतमाळ शहरात सुरु झाली आहे. संपूर्ण यवतमाळ शहर कचरामुक्त शहर करायचे आहे. त्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहन यवतमाळ नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख संदीप गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेत बोलतांना केले.
शहरातील घनकचरा निर्मुलना संदर्भात तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्याच्या बाबतीत यावेळी पत्रकारांना सविस्तर माहिती देण्यात आली. एकुण 12 बाबींवर या अभियानांतर्गत काम करावयाचे आहे. हॉस्पीटलमधील कचरा हा हॉस्पीटलच्या प्रशासनाने त्याचा निपटारा करावा. प्लास्टीक निर्मुलनासाठी 30 लोकांचे पथक शहरात सतत गस्त घालणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगीतले
