तेल्हा-यात अट्टल चोरट्याचा मेडिकल करतांना पोलीस व डॉक्टर वर जीवघेणा हल्ला



  • दोन पोलिसांच्या हातामध्ये मारली आरपार कैची तर डॉक्टर चा हात फॅक्चर
  • पोलीस वर्तुळात एकच खळबळ
  •  उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने दाखल


तेल्हारा(निलेश जवकार) - तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये अटक करण्यात आलेल्या अटल चोरट्याला आज रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान मेडिकल करण्याकरिता घेऊन गेलेल्या दोन पोलिसांवर तसेच शासकीय डॉक्टर वर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तेल्हारा शहरात घडली.

                 पोलीस स्टेशन तेल्हारा येथे चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला सोपान प्रल्हाद भिवटे वय २७ या आरोपीने लॉकअप मध्ये स्वतःला जखमी केल्याने तेल्हारा पोलीस स्टेशन चे हे कॉ गणपत गवळी व नागोराव भांगे हे सदर आरोपीला घेऊन मेडिकल करण्याकरिता गेले असता मेडिकल सुरू असताना अचानक तिथे पडून असलेली धारदार कैची दोन्ही पोलिसांच्या हातावर मारल्याने दोन्ही पोलीस गंभीर जखमी झाले तर डॉक्टर अनिल मल्ल यांचा हात फॅक्चर झाला.


अशा प्रकारचा अचानक आरोपीने हल्ला चढवल्याने पोलीस व डॉक्टर भयभीत झाले असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून.उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये दाखल होऊन घटनेची माहिती घेत असून पुढील कारवाई पोलीस करीत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post