घरकुल कॉलनी मध्ये विज व पाण्याची श्री. चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंख्याक बहुउददेशीय विकास संस्थे तर्फे मागणी


 मुर्तिजापुर :-  घरकुल कॉलनी मध्ये नागरीकांनी सभेचे आयोजन केले होते. त्या सभेला श्री. चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंख्याक बहुउददेशीय विकास संस्थे चे पदाधिकारी व हयूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे कार्यकर्त्यांना सुध्दा आमंत्रित केले होते. त्यामध्ये विज व पाणी या मुलभूत सुविधां पासून वंचित असल्याने त्या मिळवून देण्याकरिता सहायय करण्याचे निवेदन संस्था उपाध्यक्ष – सौ. निर्मला श्रीकृष्ण बोडखे व हयूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे अकोला जिल्हा पी.आर.ओ. भुषण प्रदिपकुमार महाजन यांना देण्यात आले होते. येथील नागरिकां करिता विजेची व पाण्याची मागणी करणारे निवेदन श्री. चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंख्याक बहुउददेशीय विकास संस्थेने थेट पंतप्रधानांना संबोधित करुन उपविभागीय अधिका-यांसह संबंधीतांना देण्यात आले आहे. शासकीय योजनेतून उभारण्यात आलेल्या घरकुलां मधील नागरिकांनी संस्थेचे अध्यक्ष – भुषण प्रदिपकुमार महाजन यांना मांडलेल्या कैफियतला अनुसरुन आपल्या निवेदनात संस्था अध्यक्ष – भुषण प्रदिपकुमार महाजन यांनी विजेची आणि पाण्याची सोय नसतांना घरकुल लाभार्थ्यांच्या ताब्यात दिलीतच कशी ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. पाणी तर जीवन आहे. पाणी नसल्याकारणाने महिलांचे अतोनात हाल होत आहे. तसेच विज नसल्याकारणाने संपूर्ण घरकुल कॉलनी मध्ये काळोखाने आपले साम्राज्य निर्माण केले आहे. त्यामुळे होणा-या चो-यांसारख्या विविध घटना व महिलांच्या समस्या विचारात घेता या होणा-या मनस्तापासून  घरकुल वासियांची मुक्तता करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post