शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप


मुर्तिजापुर – स्स्व्‍. नंदाबाई किर्दक बहुउददेशीय विकास संस्था, ब्रम्ही व्दारा आयोजित ग्रामपंचायत जांभा बु. येथे शासनाच्या 14 व्या वित्त्‍  आयोग योजनेतून आमचं गाव आमचा विकास कार्यक्रमा अंतर्गत मंजूर कृती आराखडयानुसार उपजिविका अनुषंगाने गावामधील मुली, महिला यांना स्स्व्‍ंयरोजगार कमविण्याकरिता प्रशिक्षण देण्यात आले. गावामध्ये शिलाई मशिन प्रशिक्षण वर्ग महिन्या पासून सुरु होता. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबत प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित नायब तहसीलदार डाबेराव, पं.स. सदस्य सौदागर खंडारे, बाळाभाऊ ठोकळ, सरपंच अरुणाताई इंगळे, संस्था अध्यक्ष – मिलिंद जामनिक, तलाठी सोनोने, दिलीप पंडीत, प्रविण खोत, नितीन तांबडे, शंकर गिरी, प्रभाकर इंगळे, प्रशांत इंगळे यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post