कॅलिफोर्नियात “कृषी भवन” स्थापणार : आ.डॉ.अनिल बोंडे



  • शेतकऱ्यांच्या उन्नत शेतीसाठी आमदारांचा पुढाकार. अधिकाऱ्यांना केले निर्देशित.


 संदीप बाजड,
अमरावती : शेती हा आपल्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा कणा आहे. देशासह राज्यातील जनता शेती व्‍यवसायावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे उत्‍पन्न सन 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याचे शासनाचे ध्‍येय आहे. या ध्‍येयपूर्तीसाठी राज्‍य शासनाने 'उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' हे महत्‍त्‍वाकांक्षी अभियान सुरु केले आहे.

कृषी विभागाच्‍या विविध योजनांच्‍या अंमलबजावणीत सुटसुटीतपणा व सुसूत्रता आणून त्‍या गतीमान आणि पारदर्शकपणे राबविण्‍यावर भर देण्‍यात येत आहे, कृषी खात्याची संपूर्णतः माहिती शेतकरी बांधवांना एका व्यासपीठावरून व्हावी याकरिता कॅलिफोर्नियात म्हणजेच वरुड - मोर्शी तालुक्यात कृषी भवनाची इमारत स्थापनेचा निर्णय आ.डॉ.अनिल बोंडे यांनी घेतला आहे.

कृषी भवनाचा प्रस्ताव त्वरित कृषी अधिकाऱ्यांनी तयार करून शासनाकडे सादर करावा असे हि डॉ.बोंडे यांनी मोर्शीत पार पडलेल्या विकास आढावा बैठकीतून निर्देशित केले. कृषी भवनाच्या स्थापनेला शासनाची मान्यता मिळाल्यास हे राज्यातील पहिले “कृषी भवन” म्हणून उदयास येईल, असे ही सुद्धा आमदार महोदयांनी बैठकीत बोलतांना सांगितले.

यावेळी आढावा बैठकीला मोर्शीचे महसूल उपविभागीय अधिकारी मनोहरराव कडू,  मोर्शी कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी राहुल सातपुते, मोर्शी महावितरणचे उपअभियंता शामल भाले, वरुडचे तहसीलदार आशिष बिजवल, वरुडचे तालुका कृषी अधिकारी उज्वल आगरकर, मोर्शीचे तालुका कृषी अधिकारी योगेश संगेकर, बेनोड्याचे मंडळ कृषी अधिकारी विशाल बिऱ्हाडे, वरुडचे मंडळ कृषी अधिकारी भास्कर स्वरते, पंचायत समितीचे सभापती शंकर उईके, उपसभापती सुनील कडू, जिल्हा परिषद सदस्य प्रा.संजय घुलझे, प्रा.अनिल डबरासे, सारंग खोडस्कर, भाजपचे तालुकाध्यक्ष अजय आगरकर, वरुड आत्मा अध्यक्षा शालिनी चोबितकार, मोर्शी आत्मा अध्यक्षा देवकुमार बुरंगे, न.प. मोर्शीच्या अध्यक्षा शिला रोडे, उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम तसेच सा.बां.विभाग वरुडचे उपअभियंता पी.यु.सोळंके, सा.बां.विभाग मोर्शीचे उपअभियंता डी.एम.तीखे, आर.आर.माळवे आर.जि.इंगोले, जिल्हा आत्मा सदस्य प्रवीण कुंडलकर, नगरसेवक दिपक नेवारे, नितीन राऊत, हर्षल चौधरी तसेच अशोक ठाकरे, राहुल चौधरी, विलास आघाडे, प्रा.दिनेश शर्मा,  निलेश चौधरी, किर्तेश शर्मा, विनोद पाचघरे, सौ. कल्पना देशमुख, प्रतिभा राऊत, सुनीता कुंभरे, भास्कर पाटील, प्रमोद बोबडे, यादवराव चोपडे, विजय सितकरे, अनिल दरवाई, प्रवीण राऊत, जुबेर पटेल, दिपक घाटोळ, मनोज माहुलकर, डॉ.शशिभूषण उमेकर, राहुल पाटील, आसिफ खान सरदार खान, आरिफ खा.इब्राहीम, शंकरराव चोबितकर, प्रितम अब्रुक, हर्षद रक्षे, मनोज तायवाडे, प्रवीण उर्फ गोलू मानकर यांच्यासह अन्य शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमदार डॉ.अनिल बोंडे पुढे बोलतांना म्हणाले कि, राज्यातील बळीराजा संपन्न, समृद्ध व स्वयंपूर्ण व्हावा यासाठी तसेच शेतीचे उत्पादन वाढून त्‍यांची आर्थिक उन्‍नती व्‍हावी, यासाठी कृषी विभाग वेगवेगळ्या योजना राबवत असते. अभियान, मोहिमांच्‍या माध्‍यमातून व्‍यापक स्‍वरुपात जनजागृती करुन शेती क्षेत्राशी संबंधित सर्वांना विकासाच्‍या प्रवाहात आणण्‍याचा प्रयत्‍न केला जातो. पिकांची उत्‍पादकता व आनुवंशिक उत्‍पादन  क्षमतेतील तफावत करुन शेतकऱ्यांनी घेतलेल्‍या पीक कर्जाच्‍या रकमेपेक्षा अधिक उत्‍पन्‍न मिळवणे. पीक विमा योजनेंतर्गत जास्‍तीत जास्‍त शेतकऱ्यांना सहभागी करुन घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानापासून शेतकऱ्यांना संरक्षित करणे हे प्रमुख उद्दिष्‍ट 'उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' अभियानाचे आहेत. शेती व्‍यवसाय म्‍हणजे आतबट्ट्याचा व्‍यवहार, असे उपहासाने म्‍हटले जाते. मात्र, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड देऊन नियोजनबद्ध प्रयत्‍न केले तर शेती व्‍यवसायात यश निश्चितच मिळते. याची राज्‍यात अनेक उदाहरणे आहेत. 'उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' हे अभियान आ.डॉ.अनिल बोंडे यांनी पुढाकार घेऊन स्वत: तालुक्यातील मोठ्या लोकासंख्येंच्या गावात 'उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' अभियानात स्वत: मार्गदर्शन करून अधिकाऱ्यात व शेतकरी बांधवांमध्ये समन्वय साधून आणला, त्यासोबतच वरुड – मोर्शी तालुका हा कृषी विकास आणि उत्‍पादक वाढीसाठी नियोजनाचा घटक म्‍हणून निश्चित करण्‍यात आला. प्रत्येक तालुक्‍यातील प्रमुख पिकांची उत्‍पादकता वाढविण्‍याच्‍या दृष्टिने आधुनिक तंत्रज्ञानाची निश्चिती करुन त्‍यांच्‍या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी एकसुत्रीकरण करण्‍यात आले. विविध निविष्‍ठा, औजारे आणि सूक्ष्‍म सिंचन संच तसेच अन्‍य पायाभूत सुविधांचे अनुदान शेतकऱ्यांच्‍या आधार संलग्‍न बँक खात्‍यावर जमा करणे यावर भर देण्‍यात आला.

          शेतीचे उत्‍पन्‍न वाढविण्‍यासाठी कमीत कमी उत्‍पादन खर्च कसा राहिल, याचाही विचार करण्‍यात आला. दर्जेदार जैविक खते, किटकनाशके यांचा वापर करुन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीचे उत्‍पन्‍न वाढविण्‍याबाबत शेतकऱ्यांना आगामी स्थापन होणाऱ्या कृषी भवनातून मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती करावी, यासाठी हि कृषी खात्याकडून प्रयत्न करण्‍यात येत आहेत. गटशेतीचे फायदे शेतकऱ्यांना पटवून देण्‍याचेही प्रयत्न या भवनातून करण्‍यात येणार असल्याने राज्यातील हे पहिले सर्वसोयीयुक्त शेतकरी "कृषी भवन” ठरणार आहे.

          राज्‍याच्‍या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला महत्वाचे स्‍थान देण्‍यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली. केंद्र व राज्‍य शासनानेही पूर्णतः त्‍या दिशेने पावले टाकली आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या  ठिबक सिंचन, शेडनेट, पिक चाळ, शेतीचे सपाटीकरण, यांत्रिकीकरण, जमिनीचे आरोग्य सुधारण्याच्या दुष्टीकोनातून तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना जमिनीची मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करून देणे यासाठी खास तरतूद करण्‍यात आलेली आहे. पंतप्रधान पीक विमा योजना, हवामान आधारित फळबाग विमा योजना यामध्‍ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्‍हावे, यासाठी खास प्रयत्न करण्‍यात आले असून यासर्व माहितीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना हक्काचे व्यासपीठ प्राप्त व्हावे यासाठी कॅलिफोर्नियात कृषी भवन स्थापनेचा निश्चय मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत केला आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post