- बदली झालेल्या डॉक्टरांना नव्याने डॉक्टर रुजू झाल्याशिवाय कार्यमुक्त करू नये
- अन्यथा जन आंदोलनाचा जिल्हा काँग्रेस चा इशारा
यवतमाळ :- सोळा तालुके असलेल्या व प्रामुख्याने शेतकरी व शेतमजूर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय वैदयकीय सेवा आधीच सलाईन वर असतांनाही व अपुरी कर्मचारी व्यवस्थेची धनी असतांनाही नव्याने डॉक्टर्स व कर्मचारी रुजू न होऊ देता थेट बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचा सपाटा अधिष्ठानानी लावला असून कित्तेक विभागातील महत्वाची पदे रिक्त झाल्याने वैद्यकीय सेवा ठप्प झालेली आहे जिल्या बाहेर जाणाऱ्या डॉक्टरांची संख्या फार मोठी असून त्या तुलनेत जिल्ह्यात येणाऱ्या डॉक्टरांची संख्या अत्यंत कमी आहे त्यातच आधीच दारिद्र्याच्या खाईत लोटलेल्या रुग्णांनी खासगी दवाखान्यातून सेवा घेणे व तपासणी करणे शक्यच नसल्याने कित्येकांच्या थेट प्राणाशी खेळल्या जाणारा खेळ तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी ने केलेली आहे.
स्व वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे संपूर्ण जिल्यातून व जिल्ह्याबाहेरील अदीलाबाद पासून रुग्ण येतात यात शेतकरी, शेतमजूर व प्रामुख्याने आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असलेल्या रुग्णाचा प्रामुख्याने समावेश आहे सध्या शेती कामाचे दिवस सुरू असून स्नेक बाईट व इतर आजाराची साथ सुरू असून दुसरी कडे प्रशासनाने बदली केलेल्या कर्मचारी व डॉक्टरांना कार्यमुक्त करण्याची साथ सुरू आहे त्या बदल्यात कुठलेही कर्मचारी व डॉक्टर यवतमाळ येथे रुजू होण्यास तयार नसून वैद्यकीय सेवा खंडित पडित आहे त्यामुळे प्रथम यवतमाळ येथे प्रथम वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टर्स रुजू करावे व नंतरच कार्यमुक्त करावे अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केलेली आहे.
सर्वच क्षेत्रात सपशेल अपयशी ठरलेल्या शासनाने आता आपल्या अपयशीपणा सिद्ध करण्यात आरोग्य यंत्रणाही सोडलेली नसून सत्ताधाऱ्यांनी अश्या पद्धतीने जिल्हा रुग्णालय डॉक्टरांविना व कर्मचार्याविना करून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे पाप थांबवावे ही जनता अश्या पापाचा घडा भरलेल्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नसून अश्या बेजवाबदार पने वागणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची खाते निहाय चौकशी झाली पाहिजे असेही जिल्हा काँग्रेस कमिटीने काढलेल्या पत्रकात म्हटलेले आहे तात्काळ प्रशासनाने वठणीवर न आल्यास जन आंदोलन उभारण्यास इशारा देखील जिल्हा काँग्रेस कमिटी ने दिलेला आहे व रुग्णांना उत्कृष्ट वैदयकीय सेवा मिळावी यासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात यावीत अशी मागणी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी करीत आहे असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिल गायकवाड यांनी एका पत्रकातून कळविले आहे
