रुपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 10 वी 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- रुपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय पाडोळी(आ) येथे 10 वी व 12वी च्या गुणवंत विदयार्थी व पालकांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. व तसेच या शाळेचा माजी विदयार्थी व पाडोळी गावचा सुपुत्र रवि सुरेश गुंड यांची PSI पदी निवड झाल्या बद्दल शाळेच्यावतिने  मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करणयात आला.
 या प्रसंगी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड.व्यंकटराव विशवनाथ गुंड,माजी जिल्हा परिषद उपअध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी,जि.प.सदस्य
ज्ञानदेव राजगुरु,भा.ज.पा.तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ  सोनटके,शरद गुंड,ग्रामपंचयत सदस्य - सौ.रुक्मिनी ज्ञानदेव खराडे,सौ.शांता माणिक आडसुळे,अभिमन्यु रावकासार,ढाकरे सहदेव,चव्हाण हनुमंत,गुंड प्रदिप, भरत गुंड,सुरेश मनसुळे,डाँ.बाबासाहेब आंबेडकर प्राथामिक शाळेचे मुख्याध्यापक,सुरवसे सर, प्रशासकिय आधिकारी भोसले,यादव सर,अमोल गुडं, गोरे सर,सोनकटले सर,जावळे सर,श्रीमती गुंड मँडम, श्रीमती मोरे मँडम,श्रीमती माळी मॅडम,सुर्यवंशी सर, प्रदीप सर,राख सर,पवार सर,गावित सर,शेरकर मामा,
यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापु शेख सर यानी केले तर आभार मुख्याध्यापक मनसुळे सर यानी मानले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post