( भविष्यात भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची महत्त्वकांक्षा)
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास हायस्कूल शाळेतील विद्यार्थीनी कु.काझी सानिया रहीमतमिया (पप्पू) हिने इयत्ता १० वी च्या परीक्षेमध्ये ९१.६०% गुण घेवून फिनिक्स भरारी घेतली आहे.
अचलेर येथील रहीमतमीया काझी हे शेतकरी कुंटुबात जन्मलेले असल्यामुळे ते परंपरागत शेती हा व्यवसाय करतात.व ते ड्रायव्हींग ही करीतात.त्यांना स्वतःला उच्च शिक्षण घ्यायची खूप इच्छा होती.पण ते त्यांना पूर्ण करता आले नाही.व यांची खंत त्यांच्या मनामध्ये सैल करीत होती.त्यामुळेच केवळ जीद्धीच्या बळावर आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देण्याचे ठरवले.व त्यांनी स्वतःकष्ट करीत वेळोवेळी आपल्या मुलीला मार्गदर्शन करीत राहिले.व सानिया हिला या यशापर्यंत पोहचवले.या कार्यात सानिया काझी यांचे आजोबा निवृत्त शिक्षक काझी सर यांनी वर्षभरांचे अभ्यासाचे नियोजन करून दिले.व वेळोवेळी तिला मार्गदर्शन करीत राहिले.आपल्या आई — वडीलांचे कष्ट व आजोबांचे मार्गदर्शन पाहुन सानिया स्वतःला प्रेरित करून मोठया जिद्धीने,चिकाटीने अभ्यास करू लागली.हे करीत असताना तिला वेळोवेळी प्रोत्साहन देवून तिचा उत्साह वाढवण्याचे काम तिचे काका पाशामिया काझी हे करीत होते.काझी दाम्पत्याला एक मुलगी व एक मुलगा असून मुलगा पाचवि वर्गात शिकत आहे.सानिया हिने अगदी १० वी च्या वर्षाच्या सुरुवातीपासुनच अभ्यासाचे नियोजन करून मनाशी पक्की खूणगाठ बांधुन काहीही झाले तरी एक चांगले यश मिळवायचे असे ठरवले होते.व त्या दिशेने प्रयत्न करू लागली.तिचा स्वभाव अतिशय हुशार,जिद्दी, प्रेमळ,शांत व समजदारपणा व ही तीचे स्वभाववैशिष्टे असल्याने ति सगळ्या विद्यार्थ्यामध्ये नेहमी मिळून मिसळून जायची.
आपल्या परीस्थीतीची जाणीव ठेवून कु.सानिया ही ने आपल्या आई — वडिलांच्या कष्टाचे चीज करीत अतिशय जीद्धीने व कष्टाने अभ्यास करीत दहावीच्या परीक्षेत ४५८ गुण मिळवित ९१.६० % गुण घेवून फिनिक्स भरारी घेतली आहे.अचलेर च्या विद्या विकास छायस्कूल शाळेत विशेष प्राविण्यासहीत हे मिळविले आहे.इंग्रजी विषयात ८५ तर गणित विषयात ९९ गुण मिळाले आहेत.सानिया ने केलेल्या कष्टा चे फळ तिला मिळाले आहे.तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.तिच हेे यश पाहुन तिचे मार्गदर्शक गुरु जगदीश सुरवसे सर व अमित लोखंडे सर यांनी अभिनंदन केले.
काझी कुंटूबातील मुलीने मिळवलेले यश व तिच्या आई — वडिलांनी केलेले कष्ट पाहुन यांच्या यशाचे अचलेर सह परीसरातून सर्वत्र कौतुका चा वर्षाव होत आहे.भविष्यात उच्च शिक्षण घेवून भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याचा मानस तिने व्यक्त केला.
दै.भास्करचे तालुका प्रतिनिधी इकबाल मुल्ला यांनी सानिया काझी शी संपर्क साधला असता,ति म्हणाली की,माझ्या यशात माझ्या आई — वडिलांचा कष्ट आहे.आई ने केलेले कष्ट मला प्रेरणा दिली . तसेच माझे गुरूजनांचा मोठा वाटा होता.शाळेव्यतीरीक्त मी दररोज पाच तास अभ्यास करीत होते. ज्यांनी आम्हाला हे यश मिळवण्याचा मार्ग दाखवल ते सत्यात येण्यासाठी खऱ्या अर्थान अथक परीश्रम घेतले ते माझे गुरु फिनिक्स कोचिंग क्लासेस,अचलेर चे संचालक जगदीश सुरवसे सर,अमित लोखंडे सर यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाने त्यांनी वर्षभर घेतलेल्या चाचणी परीक्षामुळे मला अभ्यासाला प्रेरणा मिळाली. व मी नियमीत व सातत्याने अभ्यास केले.त्यामुळे या माझ्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे.असे दै.भास्कर शी बोलताना तिने सांगितले.