तेल्हारा (निलेश जवकार)- महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त आज लोकजागर मंच तेल्हारा च्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
महाराणा प्रताप यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज लोकजागर मंच चे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे रुग्णांना लोकजागर मंच तेल्हारा तालुक्याच्या वतीने फळवाटप करण्यात आले.
यावेळी जनार्धन चतारे जेष्ठनेते, गोपाल जळमकार तालुका अध्यक्ष लोकजागर मंच ,डाॅ अनिल मल्ल , चद्रकांत मोरे ता. संघटक, शेषराव देशमुख,सागर गळसकर, अजय गांवडे ,गजानन घुमारे,अनिल बलोदे,श्याम अहेरकर, दिपक अहेरकर, वैभव वाघमारे, डाॅ नागे, सुभाष चव्हाण,सुधाकर खाडे,विनोद वाघ, डाॅ अरुणाताई भगत ,डाॅ चिराग गांधी,परिचारिका एस के वाकडे,पि एस गायकवाड ,जयश्री ढाले मॅडम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिध्दी प्रमुख निलेश जवकार यांनी कळविले आहे.