सन्मान सत्कारातुन कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते — डॉ.मोहेकर इकबाल मुल्ला


लोहारा/प्रतिनिधी :- सन्मान सत्कारातून कार्यकर्त्याला प्रेरणा मिळते व  समाजातील उपेक्षित अनाथ दुर्बलांच्या विकासाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बहुमान होतो.यातून नवीन सामाजिक कार्यकर्त्यांची फळी तयार होते.असे सामाजिक महान कार्य भूमिपुत्र वाघ व विजया वाघ हे  सामाज विकास संस्थेच्या माध्यमातून करीत आहेत, असे प्रतिपादन डॉक्टर मोहेकर यांनी केले.
उमरगा येथील समाज विकास संस्थेच्यावतीने वात्सल्य बालगृहात दि.15 जुन रोजी मधुकर धस स्मृती गौरव पुरस्कार सोहळा कार्यक्रम वात्सल्य बालगृहाच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आला.या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.प्राचार्य गरुड,डॉ.प्रा.व्यंकट अणिगुठे,बालाजी इंगळे,परमेश्वर सुकाळे,मनिषा गुंजाळ,मानवलोकचे अनिकेत लोहिया,भुमिपुत्र वाघ,विजया वाघ,अदि उपस्थित होते.
यावेळी पत्रकार इक्बाल मुल्ला,महावीर डोके,सारिका लोंढे,युसुफ मुल्ला,महादेव जोगदंड,विलास गोडगे,
 यांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.भुमिपुत्र वाघ यांनी लिहीलेले आत्मकथा वाट सुरू या पुस्तकाचे प्रकाशन कवी बालाजी इंगळे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद पांचाळ व सूत्रसंचलन अजित कांकरिया यांनी केले.तर आभार निखिल वाघ यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अलका गुरव ,आशा गुरव,ज्योती राजपूत, शालिनी पाटील ,विठ्ठल ओवाल, विद्या मारकद, आनंद वाघमारे,संतोष मोरे,अदिंनी केले.या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील लेखक ग्राम सावित्री ग्राम जोतिबा,सरपंच बचतगटातील,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post