इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
अत्यंत प्रतिकुल काळात तो काळ होता १८ व्या शतकाचा,धर्माची सुत्रे ठराविक लोकांच्या हातात होती.भारतीय स्त्री मग ती कोणत्याही जाती-धर्माची असली तरी तीला शुद्र म्हणूनच वागणूक मिळत होती.राज्यसत्ता तर दूरच पण पतीबरोबर सती जाणे,तिच्यावर बंधनकारक होते.महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याच्या नावाखाली पेशव्यांनी धुमाकुळ घातला होता.अशा काळात ३१ मे १७२५ रोजी जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी मानकोजी व सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी थोर क्रांतीकारी सामाजिक राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला.महाराणी अहिल्याबाई होळकर या भारतातील पहिल्या क्रांतीकारी समाजसुधारक महिला राज्यकर्त्या राजमाता महारणराणिनी अहिल्यादेवी होळकर यांचा खरा इतिहास तरुणांनी वाचला पाहिजे असे प्रतिपादन अंबाजोगाईचे होळकरशाही अभ्यासक अविनाश धायगुडे यांनी केले. अशोक चौकात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीचे औचित्य साधून जय मल्हार मित्र मंडळाच्या वतीने शुक्रवार(ता.१) रोजी"भारतीय इतिहासात होळकरशाहीचे योगदान"या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष शिवाजी चेंडके होते.या वेळी नगरसेवक अजित चौधरी,नगरसेविका ज्योती बन्ने,अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे,बसव प्रतिष्ठाणचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे,संतोष कांबळे,दत्तु गडवे,तुळशीराम देडे,जय मल्हार जयंती उत्सव मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय घोडके,उपाध्यक्ष राहुल बन्ने,सचिव सिद्राम सोनटक्के,कोषाध्यक्ष गुरुनाथ घोडके,सहसचिव शामराव करगले आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना धायगुडे म्हणाले की,शिवरायांच्या स्वराज्याचा झेंडा अटकेपार लावणारे आणि मध्यप्रदेशात स्वराज्याची स्थापना करणारे मल्हारराव होळकर हे अहिल्यादेवीचे सासरे होते.त्यांनी प्रजेच्या हिताचे,सुख-शांतीचे राज्य निर्माण केले.राजाचा वारसपुत्र खंडेरावाचा लढाईत मृत्यू झाला.पुढे रुढी-परंपरेने सती जाण्याची वेळ अहिल्यादेवीवर आली.परंतु जनतेसाठी निर्माण केलेले राज्य पेशव्यांच्या हातात जाऊन प्रजेला त्रास होईल म्हणूनच पाखंडी धर्माच्या श्रृखंला तोडून अहिल्यादेवीला सती न जाऊ देता तिच्या हाती राज्यकारभार सोपविण्याचे काम मल्हाररावांनी त्यावेळी केले.अहिल्यादेवीने सती जाण्याचा रुढी-परंपरा तोडून,लोक निंदेला न जुमानता,आपण मेलो तर आपल्याला सुख मिळेल परंतु जगलो तर आपल्या लाखो प्रजाजनांना सुख मिळेल म्हणून सती न जाण्याचे ठरवून धर्माच्याविरुध्द क्रांतीकारी पहिले बंड केले.धर्माच्या नावाखाली भारतीय स्त्रीला शिक्षणाचा,राज्य करण्याचा अधिकार नव्हता.त्याविरुध्द क्रांतीकारी दुसरे बंड करुन अहिल्यादेवीने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.कुटूंबातील सासरा,नवरा,मुलगा या
सर्वांच्या मृत्यूननंतर जनकल्याणासाठी मनोधैर्य खचू
न देता,धैर्याने अहिल्यादेवीनी राज्यकारभार सांभाळला.त्या जास्तीत-जास्त वेळ समाजकल्याणासाठी देत.अहिल्यादेवीनी प्रजेला त्रास देणा-यांना पकडून आणून सामोपचाराच्यात गोष्टी सांगून त्यांना जगण्यासाठी जमिनी देवून चांगल्या मार्गाला लावले.परंतु कालापरत्वे अहिल्यादेवीचे खरे कर्तुत्व हे समाजापुढे न आणता हातात पिंड घेतलेली स्त्री इतिहासाने व इतिहासकारांनी समाजापुढे उभी केली हे एक षडयंत्रच म्हणावे लागेल.कारण हातात तलवार घेतलेली अहिल्यादेवी दाखविली तर आम्ही राजा होऊन राज्यकारभार चालवू शकतो,क्रांती करु शकतो हा विचार व विश्वास बहुजन स्रीयांच्या मनात निर्माण होऊन अनेक अहिल्या उभ्या राहतील.तशा त्या लढवय्या समोर येऊ नयेत याची प्रकर्षाने काळजी तत्कालीन इतिहासकारांना व पेशव्यांना होती म्हणून त्यांनी अहिल्यादेवीचे चित्र तसे उभे केले.बहुजनांचे लोककल्यानकारी राज्य निर्माण करणाऱ्या अहिल्यादेवी आज आचरणात आणणे आज काळाची गरज आहे.यावर आज आपण विचार करायला हवा विचारातून परिवर्तन घडू शकते असे शेवटी ते म्हणाले.या सोहळ्याचे प्रास्ताविक वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड यांनी केले.अनिल जवान, श्रीकांत बन्नेसह,मराठा सेवा संघाचे दत्ता जाधव,श्रीधर इंगळे,विशाल फनेपूरे,लखन बोडवेसह मल्हार ग्रुपचे पदाधिकारी अंबादास सोनटक्के,बिरु ढंगापूरे,संतोष चेंडके,सचिन गाडेकर,शिवा पुजारी,प्रसाद दुधभाते,आकाश वगरे आदींनी पुढाकार घेवून कार्यक्रम यशस्वी केला.सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे मोहन जाधव तर आभार सरकार भिमराज ग्रुपचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी मानले.शहर व परिसरातील बहुसंख्ये नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.
