उमरगा शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील विकासकामाला शुभारंभ


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा शहरातील प्रभाग क्रं.1 मध्ये या प्रभागाच्या नगरसेविका सौ.शिल्पताई शिंदे व गोविंद घोडके यांच्या प्रयत्नातून विकास कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
या प्रभाग क्रं.1 मध्ये या विविध विकास कामाचे उदघाटन दि.2 जुन रोजी नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती ऍड.अभय भैया चालुक्य होते.
या प्रभागात जवळपास 16 लाखांचे रस्ते व नाली,
अशा विविध विकास कामास सुरुवात करण्यात आली आहे.यावेळी उपनगराध्यक्ष हंसराज(राजू) गायकवाड, न्युज सिक्सरचे संपादक सोमनाथ बनसोडे,नगरसेवक अरुण इगवे,इरप्पा घोडके,अमर वरवटे,महावीर  अण्णा कोराळे,बाबुराव सुरवसे,अरुण इगवे,दिलीप इंगळे,महादेव शिंदे,बळी कोराळे,आकाश शिंदे,भिम माळी,विठ्ठल शिंदे,अनिल इंगळे,पवन शिंदे,किशोर शिंदे,बालाजी मिरकले,सचिन खंडागळे,यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post