यवतमाळ :- येथील राजपूत विकास संघाचया वतीने, देशाचे वीरपुत्र ,महान योद्धा महाराणा प्रताप सिंह याची 478 वी जयंती साजरी करणयात आली. कार्यक्रमाचया अध्यक्ष स्थानी घाटंजी चया नगराध्यक्षा सौ.नयनाताई शैलेशसिंह ठाकुर होत्या. त्याचे शुभहस्ते राणाजींचया प्रतिमेला हारार्पण करून,पुजन करणयात आले. यावेळी नयनाताईंनी अध्यक्षीय भाषणात राजपूत समाजाने विकासात्मक कार्य करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी जेष्ठ सदस्यरतिपालसिंह ठाकुर, रतनसिंह चौहान प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते.साहित्यिक अनंतसिंह गहरवार, महाराणा प्रेमी लक्ष्मणलाल खत्री यांनी महाराणाजींचया जीवनावर विस्तृत प्रबोधन केले. प्रास्ताविक भाषणात रघुवीरसिंह चौहान यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली. सौ.गहेरवार व अम्रिता ठाकुर यांनी नयनाताई ठाकुर यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे संचालन दिनेशसिंह गहेरवार यांनी तर आभारप्रदर्षन दुर्गासिंह ठाकुर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हंसराजसिंह सोमवंशी, प्रतीकसिंह र.चौहान, शेखावत यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमा राजपुत समाजातील अनेक पुरूष व महिलांची उपस्थिति होती.