रिज़वान सिद्दीकी
मूर्तिजापूर :- भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मूर्तिजापूर लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले
भारिप बहुजन महासंघाचे तालुका सचिव संजय नाईक रुग्णालयात रूग्णांना भेटायला गेले तेव्हा या रूग्णालयात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसुन आले रूग्णांना या घाणी मुळे भयंकर त्रास सहन करावे लागत होते म्हणून संपूर्ण रूग्णालयात स्वछता मोहीम राबविण्यात आली
या रूग्णालयात समर्थ कामगार संस्था व्दारे स्वच्छता केली जात होती पंरतु दोन वर्षांपासून याना वेतन देण्यात आले नाही म्हणून दोन महिने पासून रूग्णालयात स्वछता बंद आहे शासनाने त्वरित यांचे वेतन द्यावे अन्यथा आम्ही सर्व भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ता मिळुन डी . डी व सी एस राजकुमार चव्हाण यांच्या कार्यालयाची झाड झुड करून आंदोलन करण्याचा इशारा संजय नाईक यानी दिला आहे या रूग्णालयात आपल्या परीने रुग्णाची व स्वच्छते साठी पुढे येणारे सेवक संदीप संगेले यांचे सुध्दा कौतुक करण्यात आले स्वछता अभियानाला यशस्वितेसाठी भारिपचे सक्रिय कार्यक्रते मोहन वसुकार प्रहार संघटनेच तालुका अध्यक्ष संतोष इंगोले किरण डोंगरदिवे मिलींद इंगळे अर्जुन गवई रमन नाईक राहूल थोरात सचिन गडाबे रोहीत इंगळे अक्षय आटोटे सुमित आटोटे संकेत कावरे इत्यादीकांनी परिक्षम घेतले
