पंचशील शिक्षण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थीनीचा गौरव



कुरूम : स्थानिक पंचशील शिक्षण संस्थेच्या वतीने इयत्ता १० वीच्या परिक्षेमध्ये प्राविण्य श्रेणीत प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थीनीचा तिच्या निवासस्थानी जावुन संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र कोरडे यांच्या हस्ते शनिवार दि.९ जुनला गौरव करण्यात आला.
            राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. पंचशील शिक्षण संस्था कुरूम द्वारा संचालित पंचशील विद्यालयाचा निकाल ६६.११ टक्के लागला असुन मुलींनी बाजी मारली आहे.यात विद्यालयातील १२१ पैकी ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यामध्ये ९ प्राविण्य श्रेणीत,१९ प्रथम श्रेणीत व ४७ द्वितीय श्रेणीत आले.यामध्ये प्रामुख्याने प्राविण्य श्रेणीत प्रथम येणारी कुरूम येथिल विद्यार्थीनी चंचल नरेंद्र खेरडे हिला ९२.२० टक्के गुण मिळाल्याने तिच्या निवासस्थानी जावून चंचलचा व  वडिल नरेंद्र खेरडे ,आई मंदा खेरडे यांचा पंचशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र कोरडे ,सचिव चंद्रकांत अडसोड,सहसचिव अण्णासाहेब फुटाणे,सदस्य नरेश मांडवे,सहा.शिक्षक मंगलसिंग डाबेराव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवुन तर मुख्याध्यापक रामदास कुंभारे यांच्या हस्ते पेढा भरवुन गौरव करून कौतुक करण्यात आले.यावेळी लिपीक साहेबराव रतेकर,कर्मचारी ईश्र्वर इंगोले,चंचल हिचा भाऊ सौरभ,बहिण स्नेहल,आजी गंगुबाई खेरडे उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post