लोहारा तालुक्याला पुर्वीचे गावे जोडण्यात यावीत शासनाकडे जनतेची मागणी.

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सन 1999 साली सेना भाजप युती शासनाने लोहारा तालुक्याची निर्मिती केली खरे पण नवीन  गावे अद्याप तालुक्याला वर्ग झालेली नसल्यामुळे तालुक्यातील नागरीक तिव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.
नव्यानेलोहारा तालुक्याची निर्मिती सेना भाजप युती शासनाने केली.तालुक्याचे खरे शिल्पकार पुर्वीचे आ.व सध्याचे खा.प्रा.रविद्र गायकवाड सर यानी केली.आज हि तालुक्यातील जनता सांगण्यास विसरत नाही.परंतु तालुक्याची निर्मिती करत असताना तुळजापुर, उस्मानाबाद,उमरगा,या तीन तालूक्यातील गावांचा समावेश करुन 82 गावे मिळुन लोहारा तालुक्याची निर्मिती करुन नवीन तालुका म्हणुन जाहिर करण्यात आला होता.तसा आदेश ही राज्यपालांच्या सहीने पारीत झाला.परंतु 82 गावे वर्ग होणार म्हणुन शासनाने तहसील कार्यालय,न्यायलय,पंचायत समिती,ग्रामीण रुग्णालय,गटशिक्षण कार्यालयासह विविध शासकिय कार्यालय कार्यान्वीत आहेत.परंतु युतीचे शासन गेले अन आघाडीचे सरकार  आले.  नव्याने जोडलेली गावे जैसे थी राहिले.पुन्हा भाजपा सेनेची सता येवुन चार वर्षाचा कार्यकाल संपत आला आहे.या बाबत सताधाऱ्याबरोबर विरोधक ही गप आहेत.म्हणुन जनताच रसत्यावर उतरण्याच्या तयारीत आहे.उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा, तोरंबा,पाटोदा,वडाळा,गोगाव,बरमगाव,भंडारी,धुत्ता,ककासपुर,नांदुर्गा हे दहा गावे व तुळजापुर तालुक्यातील उंडरगाव,कार्ला,वाणेगाव,सलगरा दिवटी,हिप्परगा रवा,शिवकरवाडी,किलज,बेलवाडी, चिकुंद्रा,हगलुर,होर्टी,मुर्टा,वडाचा तंडा,बोरगाव, हंगरगा नळ,इदिरानगर,नंदगाव,सिदगाव,कुन्साळी, बोळेगाव.सलगरा मड्डी,जळकोट,जळकोटवाडी, देवसींगा तुळ,गंधोरा,बोरनदीवाडी हे 26 गावे तर   उमरगा तालुक्यातील 24 गावे मिळून असा 82 गावाचा लोहारा तालुक्याची निर्मीती करण्यात आली. परंतु तुळजापुर व उस्मानाबाद या दोन तालुक्यातील  लोकप्रतिनिधीने हे गावे वर्ग न होण्याबाबत आवाज   उठवल्याने हे गावे जैसे थीच आहेत.आता केवळ 47 गावाचा छोटा तालुका आहे.शासनाचा आदेश राज्यपालाची सहीने आदेश असताना हे गावे लोहारा तालुक्याला का जोडली जात नाहीत.कसली लोकशाही असा प्रशन तालुक्यातून विचारला जात आहे.लोहारा उमरगा तालुक्यातील उस्मानाबाद जिल्ह्यांचे शिवसेना खा.प्रा.रविंद्र गायकवाड. या दोन तालुक्याचे सेना आ.ज्ञानराज चौगुले सर तर जिल्हांचे पालकमंत्री अर्जुन खोतकर सेनेची असुन केंद्रात व राज्यात भाजप सेनेची सता असताना हे गावे वर्ग का होत नाहीत,असा सवाल या तालुक्यातील नागरीकातुन विचारला जात आहे.राज्यपालांच्या आदेशाला किमत नाही का,कसले शासन,कसली लोकशाही,या बाबत लोकप्रतिनिधीने तात्काळ उस्मानाबाद,तुळजापुर या दोन तालुक्यातील गावे वर्ग करण्याबाबत  मुख्यमंत्री व राज्यपालांना भेटुन आदेश काढावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा शिवाजी अप्पा कदम,पंडीत बारगळ,बाळासाहेब पाटील,प्रताप लोभे,कुंडलीक सुर्यवंशी,मुरलीधर मोरे,सलीम शेख,गोरोबा ढोबळे,दिपक मुळे,महेश ढोबळे,विजयकुमार शिंदे,बालाजी पाटील,बाबुराव घाडगे,राम मोरे,सभाजी विरोधे,शेखर पाटील, अभिमान खराडे,अयुब अब्दुल शेख,राजेंद्र कदम, राजेंद्र पाटील,दयानंद गिरी,हाजी बाबा शेख,गगन माळवदकर,यांच्यासह सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post