दिगर्स :- पोलिस ठाण्याचे ट्राॅफिक पोलिस तुळशीराम बदु राठोड ब.न.४४१ वय ५७ यांनी श्रीनिवास नामदेव राठोड याचे हस्ते एका यॅटो चालकाकडून गुरुवार,७ जुनला ४०० रुपयाची लाच स्विकारतांना रंगेहात पकडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
येथील मानोरा चौकातील यॅटो चालकाची कारवाई न करण्यासाठी तुळशीराम बदु राठोड यांनी ५०० रुपयाची लाच मागीतली या तक्रारी वरुण यवतमाळचे अॅन्टी करप्शन ब्युरोने साफळा रचून तुळशीराम राठोड व खाजगी इसम श्रीनिवास राठोड या दोघांना रंगेहात पकडले. येथील विश्रामगृह येथे हि कारवाई करण्यात आली आहे. सेवानिवृत्त होण्याच्या अखेरच्या दोन महिन्यात ट्रॅफिक पोलिसाला ४०० रुपयाची लाच घेणे चांगलेच अंगलट आले असून हि कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरोचे नितीन लेव्हरकर यांनी केली आहे. यात त्यांच्या चमूने साफळा रचून रंगेहात पकडल्याने शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
