रस्त्यावर खड्डा दिसला तर इथे कॉल करा, ४८ तासांत होणार कार्यवाही.


मुंबईत जोरदार पावसामुळे  काही ठिकाणी पडणारे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने यंत्रणा तैनात ठेवली आहे. यामध्ये कुठल्याही विभागात पडलेल्या खड्डय़ाची तक्रार ऑनलाइन करता येणार असून १ ते ४८ तासांत ही तक्रार सोडवली जाणार आहे. यासाठी पालिकेने २४ वॉर्डसाठी व्हॉटस्ऍप क्रमांकही सुरू केले आहेत.

राज्यासह मुंबईतही जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिक-प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी खास उपाय योजना केल्या आहेत.

भरपावसातही खड्डे बुजवण्याचे काम सुरू राहावे यासाठी लागणारे कोल्डमिक्स पालिका स्वतः तयार करीत आहे. यामध्ये या पावसाळय़ासाठी लागणारे अडीच हजार टन कोल्डमिक्स तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ४० टन कोल्डमिक्स तयार करण्यात आले आहे. त्यामुळे प्रति २५ किलोप्रमाणे ७५० बॅग्स कोल्डमिक्स तयार ठेवण्यात आले आहे. पालिकेने तयार केलेल्या

कोल्डमिक्सपासून भरपावसात खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले असून यामध्ये १०० टक्के यश आले आहे. त्यामुळे मुंबईकरांचा पावसाळा सुखकर जाईल असा विश्वास अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प संचालक विनोद चिठोरे यांनी व्यक्त केला.

रस्त्याच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक – १८००२२१२९३

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post