भडका तेल.. मोदी फेल. आंदोलनाने बस स्थानक परिसर दणाणले युवक काँग्रेस चे अभिनव आंदोलन


मक़सूद अली 
यवतमाळ: दिनांक 2 जून: डीझेल, पेट्रोल व जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेल्या भावाने सर्वसामान्य जनता होरपळून निघाली असून सर्वांचे बजेट बिघडले असल्याने तात्काळ डिझेल व पेट्रोल चे भाव कमी करण्याच्या मागणी साठी युवक काँग्रेस ने बस स्थानक परिसर व दत्त चौक परिसरात फेरी काढून आपला निषेध नोंदवला या वेळी भडका तेल.. मोदी फेल.., व वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या वेळी आंदोलन कर्त्यांनी गांधी मार्गाचा अवलंब करीत पेट्रोल पंपाबाहेर ग्राहकांना गुलाबाची फुले दिलीत हीच बाब आंदोलनाचे प्रमुख आकर्षण होते.

जाहिरात

सर्व स्थरातून नाराजी चा भडका उडत असतांना भाजपा शासनाने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावल्या असल्याची प्रतिक्रिया या वेळी यवतमाळ वाशिम लोकसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी व्यक्त केली ते पुढे म्हणाले की डिझेल व पेट्रोल दर वाढीचा फटका हा सर्व स्थरातून महागाई वाढी च्या स्वरूपातून थेट जनतेला याचा भुर्दंड बसत असून आधीच देश  बेरोजगारी सारख्या मोठ्या समस्येला पुढे जात असतांना अश्या महागाईचा आम्ही निषेध करतो. यावेळी चंद्रशेखर चौधरी, माधुरीताई अराठे, अनिल गायकवाड, अनिल देशमुख, संजय ठाकरे, स्वातीताई येडे, बाळू काळे, वैशाली सवाई, पल्लविताई रामटेके,  सिकंदर शहा, कौस्थुभ शिर्के, रितेश भरुट, कृष्णा पुसनाके,  दत्ता हाडके, ललित जैन, अजय किन्हीकर, अरुण ठाकूर, चंद्रशेखर नंदेश्वर, पारस अराठे, रजिक पटेल, कुणाल जतकर, नितीन गुघाणे, हिरा मिश्रा, मनीष बोनकिले यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post